चांगला-वाईट कसाही असला तरी इतिहास आहे, औरंगाबदचे नाव बदलू देणार नाही..

बाळासाहेब थोरात यांचा उल्लेख गोट्या असा करत त्यांनी टीका केली, तर अशोक चव्हाण यांना आम्ही लवकरच नांदेडमध्ये येत आहोत, असा इशाराही दिला. (Mp Imtiaz jalil)
Aimim And Others March Against Renameing  Aurangabad News
Aimim And Others March Against Renameing Aurangabad NewsSarkarnama

औरंगाबाद : या शहराला एक इतिहास आहे, चांगला-वाईट कसाही असला तरी तो कुणाला बदलता येणार नाही. त्यामुळे या शहराचे नाव औरंगाबाद (Aurangabad) होते, आहे आणि यापुढेही कायम राहील. कुठल्याही परिस्थितीत हे नाव बदलू देणार नाही. त्यासाठी रस्त्यावर आणि न्यायालयात लढायची देखील आमची तयारी आहे, असा इशारा खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी दिला. नामांतर विरोधी कृती समितीच्या वतीने आज शहरात मूक मोर्चा काढण्यात आला.

भडकलगेट ते आमखास मैदानापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात (Aimim) एमआयएमसह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाचा समारोप इम्तियाज जलील यांच्या भाषणाने झाला. हा मोर्चा एमआयएमचा नसून सर्वपक्षीय असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत औरंगाबादचे नामांतर करण्याचा प्रस्ताव मंजुर केला तेव्हा काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध केला नाही, याचा संदर्भ देत त्यांनी बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली. गेल्या काही महिन्यांपासून औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा विषय तत्तकालीन महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यावर होता.

शिवसेनेत मोठी फूट पडल्यामुळे ठाकरे सरकार कोसळले. पण जाताजाता ठाकरेंनी औरंगाबाद व उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मंत्रीमडंळ बैठकीत मंजुर करून घेतला. तेव्हापासून हा विषय चांगलाच तापला आहे. एमआयएमने पुढाकार घेत या विरोधात एक कृती समिती स्थापन केली आणि याच समितीच्या वतीने आज शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चा संबोधित करतांना इम्तियाज जलील म्हणाले, आमच्या समान किमान कार्यक्रमात औरंगाबादच्या नामांतराचा विषय नव्हता असे सांगणाऱ्या काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीची तर आता वाट लागणार आहे. केवळ राजकारणासाठी मूग गिळून बसलेल्या या पक्षांना व त्यांच्या नेत्यांना जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. शहरातील तरुणांच्या हाताला रोगजागर नाही, नागरिकांना प्यायला पाणी नाही, नोकरी, पाणी मागणाऱ्यांना हे सांगतात आम्ही तुम्हाला नामांतर दिले.

Aimim And Others March Against Renameing  Aurangabad News
Shivsena : मुस्लिम मतं काॅंग्रेस-राष्ट्रवादीकडे जाऊ नये, म्हणून एमआयएमचा मोर्चा..

छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज हे महान आणि मोठे आहेतच तुमच्या नाव देण्याने त्यांची उंची वाढणार नाही, पण तुम्ही कधी मोठे होणार असा टोला देखील इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या नेत्यांना लगावला. या शहराला एक इतिहास आहे, तो चांगला-वाईट असू शकतो, पण तो पुसण्याचा प्रयत्न कुणी करू नये. एक नवे आंतरराष्ट्रीय स्तराचे शहर बनवा त्याला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव आम्ही घेऊन जाऊ, असेही इम्तियाज जलील म्हणाले.

शरद पवार यांनी आधी निर्णय सर्वसंमतीने झाला असे टीव्हीवर सांगतिले, पण नंतर लगेच याबद्दल आम्हाला काहीच माहित नव्हते अशी भूमिका घेतली. तेव्हा झूट बोले कव्वा काटे हे त्यांनी लक्षात ठेवावे, अशी टीकाही इम्तियाज यांनी केली. बाळासाहेब थोरात यांचा उल्लेख गोट्या असा करत त्यांनी टीका केली, तर अशोक चव्हाण यांना आम्ही लवकरच नांदेडमध्ये येत आहोत, असा इशाराही दिला. शेवटी जबतक सुरज चांद रहेगा, औरंगाबाद नाम रहेंगा, अशा घोषणा देत या मोर्चाचा समोरोप करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in