Manoj Jarange On Aarakshan: आम्हाला कुठलं आरक्षण हवं ; जरांगेंनी स्पष्टचं सांगितलं

Jalna Maratha Aarakshan News : गेल्या आठ दिवसांपासून मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत.
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama

Jalna Political News : जालन्यात झालेल्या हिंसाचारानंतर अखेर उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी पहिल्यांदा आपल्याला कोणते आरक्षण हवे आहे, यावर भाष्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले आरक्षण आम्हाला नकोय, अशी स्पष्ट भूमिका जरांगे यांनी स्पष्ट केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेटीनंतर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत जरांगेंनी मराठवाड्यातील मराठा समाजाला कोणत आरक्षण हवंय यावर भाष्य केलं आहे.

यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, हैदराबाद संस्थानात असताना आम्हाला आरक्षण होतं. त्यासाठी हा लढा आहे. त्यांच्या म्हणण्याचा उद्देश असा होता ते आरक्षण मिळणार नाही, सरकार झुलवत ठेवेल. पण आमच्यात चर्चा झाल्यानंतर आम्ही जेव्हा कोणतं आरक्षण मागत आहोत हे त्यांना सांगितलं तेव्हा ते पॉझिटिव्ह झाले.

Manoj Jarange
Raj Thackeray In Jalna : लाठीमाराचे आदेश देणाऱ्यांना मराठवाडाबंदी करून टाका; राज ठाकरेंचा रोख कुणाकडे ?

सर्वोच्च न्यायालयात असलेल्या आरक्षणाची आमची मागणी नाही. न्यायालयात जे आरक्षण रद्द झाले, त्या आरक्षणाची आमची मागणी नाही. मराठवाडा अखंड महाराष्ट्रात सामील झाला. पण हैदराबाद संस्थानात असताना आम्हाला आरक्षण होतं. ते आरक्षण आम्हाला लागू करण्यात आलं नाही. हे सांगितल्यानंतर राज ठाकरे यांच्या खरा विषय लक्षात आला. असही जरांगेंनी स्पष्ट केलं.

यावेळी मनोज जरांगे यांनी त्यांचं उपोषण नक्की कशासाठी आहे, याकडेही लक्ष वेधलं. " मराठवाडा आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा शेती हा मूळ व्यवसाय आहे. या समाजाला सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र देण्यात यावे, म्हणून आम्ही हा लढा उभा केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आरक्षणाशी आमचा काहीही संबंध नाही. आज सरकारने जी बैठक लावली आणि समितीचा अहवाल घेतला. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील काही तालुक्यात मराठा कुणबी समाजाचे पुरावे सापडले आहेत.

Manoj Jarange
Patole on Gadkari : ...तर नितीन गडकरी होतील पंतप्रधान, नानांनी सांगितला 'फाॅर्म्यूला' !

काल मंत्री गिरीश महाजन साहेबांनी जीआर काढण्यासाठी आम्हाला काही आधार पाहिजेत असं सांगितलं होतं. त्यांना ते पुरावे समितीकडे सादर करण्यात आले आहेत. राज ठाकरेंना हे सांगितल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात असलेल्या आरक्षणाचा हा विषय नाही, हे त्यांच्या लक्षात आलं, हा विषय वेगळा आहे. आमची बाजू ऐकल्यानंतर त्यांनी आपण मुख्यमंत्र्यांकडे या विषयावर चर्चा करण्याचं आश्वासन दिलं.

''पण जोपर्यंत त्यांना आमचा विषय कळला नव्हता तोपर्यंत ते मराठा आरक्षणासाठी आपल्याला झुलवत ठेवणार असंच सांगत होते. राज ठाकरेंनी आमचा विषय ऐकताना काही नोंदी लिहून घेतल्या आणि आपण मुख्यमंत्र्यांसमोर हा विषय मांडण्याचं आश्वासनही दिल. त्यांची बाजू आम्हाला योग्य वाटली. आम्ही राज ठाकरेंनी कायदेशीररित्या आपली बाजू सांगितल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in