Kanhaiya Kumar news : 'भारत जोडो यात्रा कशासाठी?' कन्हैया कुमारांनी दिले उत्तर

Bharat Jodo Yatra | समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिक यात सहभागी होत आहेत.
Bharat Jodo Yatra | Kanhaiya Kumar
Bharat Jodo Yatra | Kanhaiya Kumar

मुजाहेद सिद्दिकी

Bharat jodo Yatra : हिंगोली : "ही आमची प्रचार यात्रा नाही. प्रचार करायचा असता तर आम्ही यावेळी गुजरातमध्ये असतो. ही आमची विचार यात्रा आहे," असे मत कॉंग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार यांनी व्यक्त केलं आहे.

भारत जोडो यात्रा काल हिंगोली जिल्ह्यात पोहचली. यात्रा दाती फाट्यावर पोहचली असता कन्हैया कुमार यांना चहा पिण्याची इच्छा झाली होती. पण रस्त्यावरील सर्व हॉटेल बंद होते. पण जवळच एक हॉटेल सुरु असल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी आपला मोर्चा तिकडे वळवला. याचवेळी त्यांनी माध्यमांशी चाय पे चर्चा ही केली.

Bharat Jodo Yatra | Kanhaiya Kumar
Afzal Khan's grave : अफजल खानाच्या कबरीजवळ 'त्या' तीन कबरी कोणाच्या?

'प्रमुख नेते यात्रेत असताना गुजरात निवडणुकीचे काय?' असा सवाल विचारला असता ते म्हणाले की, "राजकारणासाठी ही यात्रा नाही. निवडणुकीचे काय आम्ही हरणार किंवा जिंकणार. बस एवढेच. पण, सध्या आम्हाला समाज व्यवस्थेसाठी विचारांची पेरणी करायची आहे. ते महत्त्वाचे आहे.''

तसेच, यात्रेत सहभागी होणारे कुठल्याही एका पक्षाचे किंवा एका व्यक्तीचे प्रेमी, एका समाजाचे लोक नाहीत. सर्वसमावेशक व सर्व समाजातले लोक आहेत. काँग्रेस हा पक्ष नसून ही एक विचारधारा आहे. समाजवादी विचारधारा जिवंत ठेवण्यासाठी ही यात्रा असल्याचं सांगत आता थांबायला नको अजून खूप चालायचे असे म्हणते ते उठले आणि चालायला लागले.

'भारत जोडो यात्रेमुळे बदल घडेल का?' असा सवाल त्यांना विचारला. "बदल हा पृथ्वीचा नियम आहे. बदल हा होतोच. पण, बदलासाठी कुणीतरी पुढाकार घेणे गरजेचे आहे. या यात्रेमुळे बदल होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ही यात्रा लोकांना भावनिकरीत्या जोडत आहे. याकडे तुम्ही सूक्ष्म निरीक्षण करून पाहा. समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिक यात सहभागी होत आहेत. त्यात शेतकरी, बेरोजगार युवक, महिला, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक,लहान मुले यांचाही सहभाग आहे. यात मतदार जोडण्याचा कुठल्याही प्रयत्न नाही, असही त्यांनी सांगितलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in