शिवसेना आमदार सावंत यांच्या फडणवीस भेटीत दडलंय काय?

आमदार सावंत यांचा मदतीचा हात मोठा असला तरी त्याच्या स्वभावाचा राजकारणात त्यांना कायम त्रासच झाला. (Mla Tanaji Sawant)
Sawant-Fadanvis

Sawant-Fadanvis

Sarkarnama

परंडा ः शिवसेनेतील वजनदार आमदार आणि गेल्या सरकारमध्ये राज्यमंत्री राहिलेले आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) सध्या नाराज आहेत. (osmanabad)जिल्ह्यात आपल्याच पक्षातील लोकप्रतिनिधींशी त्यांचे वारंवार खटके उडतांना दिसत आहेत. (Shivsena) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत सावंत यांचा झालेला वाद त्याचेच उदाहरण म्हणावे लागेल.

मी देशाच्या कुठल्याही कोपऱ्यातून खासदार होऊ शकतो असे म्हणत, आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न देखील सावंत यांनी मध्यंतरी केला होता. परंतु सध्या पक्षनेतृत्वाकडून दुर्लक्ष होत असल्याने नाराज असलेल्या सावंतांच्या भाजप नेत्याशी भेटीगाठी वाढल्या आहेत. तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याशी देखील सावंत यांची जवळीक वाढली आहे.

एवढेच नाही तर काही दिवसांपुर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करतांनाचा सावंत यांचा फोटो देखील सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले गेले. आता याच भेटीगाठी आणि जवळीकीमुळे तानाजी सावंत शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. जिल्हयात हा नवा राजकीय ' गोधळ ' सुरु झाल्यानंतर तरी पक्षश्रेष्ठी सावंत यांची दखल घेतात?की मग दुर्लक्ष करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपल्या वागण्या आणि बोलण्यातून सावंत याचा तडकफडक स्वभाव अनेकदा समोर आला आहे. सावंत यांनी कमी दिवसात राजकारणात मोठा टप्पा गाठला. भल्याभल्यांना जे जमलं नाही ते सावंत यांनी करून दाखवले. मातोश्रीवर शब्दाला किमंत आणि वजन असल्यामुळेच सावंत यांच्या महत्वाकांक्षाही वाढल्या. साखर कारखानदारीच्या माध्यमातून तालुक्यातील सोनारी येथे भैरवनाथ साखर कारखान्याची उभारणी करत सावंत यांनी सहकार क्षेत्रातील आपली ताकदही दाखवून दिली होती.

शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांना स्वतःच्या भावाचे तिकीट कापून डोणजा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिली तेथून ते विजयी झाले. तरी देखील राजकारणा पासून दूर असलेल्या आमदार सावंत यांनी याभागात मोठे काम उभे केले. नाला सरळीकरण खोली करणाचे मोठे काम या भागात त्याच्या पुढाकारातून झाले. या योजनेला स्व. बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती असे नाव देत त्यांनी पक्षप्रमुखांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले.

यवतमाळ विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेले सावंत थेट मंत्री झाले. शिवसेनेची जिल्ह्याची सुत्रे थेट आमदार प्रा. सावंत यांच्या हातात आली. गेल्या वेळी परंडा विधानसभा मतदार संघातून त्यांनी पंधरा वर्ष आमदार असलेल्या अन् पवार परिवाराची कृपा दृष्टी असलेल्या राहूल मोटे यांचा पराभव केला. महाआघाडीच्या सत्तेत मात्र त्यांना मंत्री पद मिळाले नाही. मातोश्रीच्या आंगणात त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.

<div class="paragraphs"><p>Sawant-Fadanvis</p></div>
काॅंग्रेस-राष्ट्रवादीने आरक्षणाच्या नावाखाली मुस्लिमांना गंडवले

काही दिवसांपूर्वी उस्मानाबाद येथील बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कामकाजावर सावंत यांनी नाराजी व्यक्त केली होती. ही घटना ताजी असताना तुळजापूरचे भाजपाचे आमदार पाटील यांच्यासह त्यांनी विरोधीपक्ष नेते फडणवीसाची घेतलेली भेट जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापवणारी ठरली आहे. आमदार सावंत यांचा मदतीचा हात मोठा असला तरी त्याच्या स्वभावाचा राजकारणात त्यांना कायम त्रासच झाला.

माजी आमदार पाटील, माजी खासदार गायकवाड, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह अनेक दुसऱ्या फळीतील नेते भविष्यात त्यांच्यासोबत असतीलच असे नाही. तर पक्ष प्रमुख ठाकरे यांच्याशी देखील सावंत यांचे आता पहिल्या सारखे संबंध नाहीत. त्यामुळे सावंत आणि तुळजापूरचे आमदार पाटील यांची भेट जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळे वळण देऊ शकते.

आमदार पाटील मागील वेळी देखील लोकसभेची निवडणूक लढविण्यास तयार नव्हते. त्यांना राज्याच्या राजकारणात रस आहे. त्यामुळे सावंत भाजपमध्ये आल्यास राणा पाटील यांचे काम सोपे होईल. परंतु सावंत यांच्या भाजप प्रवेशात प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर हे अडचणीचे ठरू शकतात. त्यांना राजी केले तर सावंत यांचा भाजपमधील प्रवेश निश्चिच असल्याचे बोलले जाते. आता सावंत यांचे हे दबाव तंत्र आहे? की मग त्यांनी खरंच भाजपमध्ये जाण्याचे मन बनवले आहे हे लवकरच स्पष्ट होईल.

भेटीचा चुकीचा अर्थ काढू नये

दरम्यान, प्रा. सांवत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आमदार राणापाटील यांच्या समवेत घेतलेल्या भेटीचा कुणी चुकीचा अर्थ काढू नये, असे स्पष्ट करत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. गौतम लटके यांनी सावंत यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. सावंत हे शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सामान्य जनतेची कामे करत असून पक्षाची भूमिका मांडत आहेत.

जिल्ह्यात संघटना कशी वाढेल यासाठी सातत्याने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा कसा फडकेल? यासाठी ते सक्रीय असतात. दोन दिवसांपुर्वीच त्यांनी निष्ठावान शिवसैनिकांचा सन्मान करण्याची भूमिका जाहीर केली होती. त्यामुळे या भेटीचा चुकाचा अर्थ काढणे चुकीचे असून या निमिताने सुरू असलेल्या चर्चामध्ये कसलेही तथ्य नसल्याचे लटके यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in