बीडच्या शिवसेनेत चाललंय काय?

पक्षाचे बडे नेते दौऱ्यावर असताना पक्षाच्या निम्म्याहून अधिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या दौऱ्याकडे पाठ का फिरवली असा अनेकांना प्रश्न पडला आहे.
बीडच्या शिवसेनेत चाललंय काय?
Beed ShivsenaSarkarnama

बीड : काही दिवसावर आलेल्या नगरपालिका, नगर पंचायत निवडणूकीच्या तोंडावर आल्या शिवसेनेतील सुंदोपसंदी वाढत आहे. याचा प्रत्यय सोमवारी (ता.४ऑक्टोबर) बघायला मिळाला. निम्म्याहून अधिक शिवसेना आंदोलनात सहभागी तर, शिवसेना नेते पीक पाहणीत होते व्यस्त होते. विशेष म्हणजे पक्षाच्या नेत्यांच्या दौऱ्यात शिवसेनेचे (Shivsena)माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaidutt Kshirsagar)देखील सहभागी झाले नाही. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. यामुळे शिवसेनेत नेमक चाललंय काय, असा प्रश्न चर्चीला जात आहे.

Beed Shivsena
फक्त गोड-गोड बोलून आणि धीर सोडू नका म्हणून भागणार नाही; मेटेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

काही दिवसांपूर्वी मंत्री संदीपान भुमरे यांच्या बैठकीत उपजिल्हाप्रमुखांनी शिवसेना जिल्हा प्रमुखांवर पैसे कमविण्यात गुंग असल्याचा व पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ आंदोलनात यायला वेळ नाही. असे आरोप करत, आपल्याला शिवसेनेकडून साथ मिळत नसल्याचेही आरोप केले होते. यानंतर लगेच शिवसेना उपजिल्हा प्रमुख हनुमंत जगताप यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. याप्रकरणी सुरूवातीला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे नोंद झाले. मात्र, हल्ल्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांचाच हात असल्याचे स्पष्ट झाले, आणि शिवसेनेच्या गुंजाळ यांना अटक झाली. मात्र, आता यालप्रकरणातील मुख्य सुत्रधाराला अटक करावी, या मागणीसाठी सोमवारी (दि.४ ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जगताप यांनी उपोषण केले.उपोषणात शिवसेनेच्या विद्यमान निम्म्याहून अधिक पदाधिकाऱ्यांनीच सहभाग घेतला.

विशेष म्हणजे, माजी जिल्हाप्रमुख देखील आंदोलनात सहभागी झाले. पण, नेमके दोन्ही जिल्हाप्रमुख आणि काही पदाधिकाऱ्यांनी याकडे पाठ दाखविली. आंदोलनातील या दुहीमुळे हल्ल्यातील 'सुत्रधार नेमके कोण'? असा प्रश्न आता चवीने चर्चीला जात आहे. त्यातच एकाबाजूला पक्षातील बड्या पदाधिकाऱ्यांवरील हल्ल्या प्रकरणी आंदोलन सुरू असताना जिल्ह्यात आलेले पक्षाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आंदोलनाकडे पाठ का फिरवली? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. तर, पक्षाचे बडे नेते दौऱ्यावर असताना पक्षाच्या निम्म्याहून अधिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या दौऱ्याकडे पाठ का फिरवली असा दुसरा प्रश्न पडला आहे.

Beed Shivsena
आम्ही बांधावर होतो, तेव्हा त्या अमेरिकेत होत्या : धनंजय यांची पंकजांवर टीका

दरम्यान, खैरे यांच्या दौऱ्यात शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर देखील सहभागी झाले नाहीत. शिवसेना पदाधिकाऱ्यांवर हल्ला प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनाला खैरे यांनी भेट द्यावी, यासाठी अनेक आजी- माजी पदाधिकाऱ्यांनी त्यांना गळ घातली होती. मात्र, काही पदाधिकाऱ्यांनी खैरेंना 'नको' असा हट्ट धरला आणि तोच हट्ट त्यांनी पुरवला असल्याचेही बोलले जात आहे. शिवसेनेतील या घडामोडींमुळे शिवसेनेत नेमक चाललंय काय, असा प्रश्न पडला आहे.

Related Stories

No stories found.