बीड जिल्ह्यात चाललंय काय? सहा महिन्यात दुसरा बनावट देशी दारुचा कारखाना उघडकीस

(Beed police Raid Duplicate Liquor Factory)या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणावर लेबल, रिकाम्या बाटल्या, कार्टून, भरलेल्या बाटल्या, बाटल्या सील करण्याचे मशीनसह एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Raid On Duplicat Liquor Factory
Raid On Duplicat Liquor Factory Sarkarnama

बीड : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या पुरत्या चिंधाड्या उडाल्या आहेत. गुटखा, मटका, चोऱ्या, हल्ले, महिला अत्याचार वाढल्याने जिल्ह्यात माफियाराज सुरु असल्याचा गंभीर आरोप विरोधक करत आहेत. यातच गुरुवारी (ता. २८) बीडजवळ बनावट देशी दारु निर्मितीचा कारखाना असल्याचे उघडकीस आले. उत्पादन शुल्क व पोलिसांच्या संयुक्त पथकाने या कारखान्यावर धाड टाकत कारवाई केली.

कारवाईपेक्षा बनावट देशी दारु कारखाना शहराजवळ कसा सुरु होता, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. मधल्या काळात गुटख्यांचे मोठे साठे पोलिसांच्या कारवाईत समोर आले होते. आता अशा साठवणूक आणि निर्मितींमुळे जिल्ह्यात नेमकं काय चाललयं असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे सहा महिन्यांपूर्वी उत्पादन शुल्क विभागाच्या छाप्यात असाच एक बनावट दारु उत्पादन निर्मिती करणारा कारखाना उघडकीस आला होता.

त्या प्रकरणातील आरोपीच आजच्या कारवाईत देखील सापडले आहेत. म्हणजे कारवाई होत नसल्याची भिती नसावी किंवा झाली तरी त्याचा जरब नसावा असेच लक्षण यातून दिसते आहे. शहरापासून काही अंतरावर असलेल्या बहीरवाडी शिवारात एका गोदामात हा बनावट देशी दारु निर्मितीचा कारखाना सुरू होता. बॉबी, संत्रा, टँगो प्रिमियम, भिंगरी संत्रा, रॉकेट देशी दारूचे चार ब्रँड या ठिकाणी उत्पादीत करण्यात येत असल्याचेही समोर आले.

या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणावर लेबल, रिकाम्या बाटल्या, कार्टून, भरलेल्या बाटल्या, बाटल्या सील करण्याचे मशीनसह एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पथकाच्या छाप्यानंतर आरोपी फरार झाले असून सदरचा कारखाना हा रोहीत चव्हाण याचा आहे.

यापुर्वीही पिंपळनेर पोलिस ठाणे हद्दीत असाच बनावट दारु तयार करणाऱ्या कारखान्यावरील कारवाईत रोहित चव्हाण आरोपी होता. त्याने केशव गायकवाड याच्याकडून ही जागा भाड्याने घेतलेली असल्याची माहिती आहे.

उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन घुले, बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश उबाळे, फौजदार पवरकुमार राजपुत, फौजदार नाईकवाडे, वाघमारे, अंकुश वरपे, रविंद्र जाधव, घोरपडे, शेळके, खाडे, मोरे, पाटील, सांगोळे, गोणारे, लोमटे, मस्के, जारवाल यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Raid On Duplicat Liquor Factory
लाचखोर तहसिलदार शेळके कोणत्या नेत्याच्या आश्रयाला?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com