Cm Eknath Shinde -Fadanvis Maratha Reservation News
Cm Eknath Shinde -Fadanvis Maratha Reservation NewsSarkarnama

Maratha Reservation News : मराठा आरक्षणाचे काय झाले ? वाहन मोर्चा काढून जाब विचारणार..

Aurangabad : मराठा मुख्यमंत्री असल्यामुळे ते तरी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतील असे वाटत होते.

Aurangabad : मराठा आरक्षण प्रश्नी केंद्र आणि राज्यातले सरकार समाजाला फक्त आश्वासन देत आहेत. आतापर्यंत दिलेली सगळी आश्वासनं हवेत विरली आहेत. (Maratha Reservation) याचा या दोन्ही सरकारला जाब विचारण्यासाठी येत्या २८ फेब्रुवारी रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कायगांव टोका ते मुंबईच्या आझाद मैदानापर्यंत वाहन मोर्चा काढण्यात येणार आहे.

Cm Eknath Shinde -Fadanvis Maratha Reservation News
Osmanabad News : पालकमंत्र्यांविरुद्ध भाजप आमदाराची तक्रार हा खोडसाळपणा..

मराठा क्रांती मोर्चाचे रमेश केरे पाटील यांनी ही घोषणा केली. औरंगाबाद जिल्ह्यातील कायगांव टोका येथील हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकाला अभिवादन करून हा वाहन मोर्चा मुंबईकडे निघणार आहे. (Eknath Shinde) या मोर्चाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत केरे पाटील म्हणाले, राज्यात सत्तांतर होवून सहा महिने झाले, मराठा मुख्यमंत्री असल्यामुळे ते तरी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतील असे वाटत होते. (Aurangabad)

पण त्यांना आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालायला वेळच मिळत नाहीये. फक्त समित्या स्थापन करून हे सरकार वेळ मारून नेत आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चार महिन्यात या प्रश्नावर एकही बैठक घेतली नाही. त्यामुळे समाजाचा आता त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. खरतर त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

येणाऱ्या अर्थसंकल्पात मराठा समाजासाठी ५ हजार कोटींची तरतूद करावी, अशी मागणी देखील मराठा मोर्चाच्या वतीने करण्यात आली. एकूणच मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकारची निराशावादी भूमिका पाहता २८ कायगाव टोका येथून सकाळी ११ वाजता हा वाहन मोर्चा निघेल. नेवासा, नगर, सुपा, शिक्रापूर मार्गे चाकण येथे मुक्काम करून पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी मोर्चा आझाद मैदानाकडे निघेल, असे यावेळी सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com