Sanjay Shirsat : आदित्य ठाकरेंना काय अक्कल ? त्यांनी फक्त टक्केवारी घेवून दुकानदारी केली..

Marathwada : विधानसभेच्या सभागृहात बाळासाहेबांचे तैलचित्र लागणे यापेक्षा दुसरा कोणता आनंद असू शकतो.
Aditya Thackeray-Sanjay Shirsat News, Aurangabad
Aditya Thackeray-Sanjay Shirsat News, AurangabadSarkarnama

Shivsena : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. या निमित्ताने विधिमंडळात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते होत आहे. एकीकडे हे उत्साहाचे वातावरण तर दुसरीकडे यावरून ठाकरे आणि शिंदे गटात शिमगा सुरू आहे. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी काल औरंगाबादेत केलेल्या विधानानंतर शिंदे गट अधिक आक्रमक झाला आहे.

Aditya Thackeray-Sanjay Shirsat News, Aurangabad
Sanjay Shirsat : बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही म्हणणाऱ्यांच्या थोबाडीत मारलं पाहिजे..

गद्दारांच्या हाताने माझ्या तैलचित्राचे अनावरण होत आहे, असे माझे आजोबा विचार करत असतील`. अशी टीका आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केली होती. यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आदित्य ठाकरे यांची अक्कलच काढली. हिंदू जनजागृती महारॅलीनंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना शिरसाट यांची जीभ घसरली.

ते म्हणाले, आदित्य ठाकरे यांना काय अक्कल आहे? टीका करण्याएवढीच त्यांची अक्कल. इतकी वर्ष त्यांनी बाळासाहेबांच्या नावाने फक्त टक्केवारी घेवून दुकानदारी केली, त्यामुळे बाळासाहेबांच्या तैलचित्राचे त्यांना काय कौतुक. विधानसभेच्या सभागृहात बाळासाहेबांचे तैलचित्र लागणे यापेक्षा दुसरा कोणता आनंद असू शकतो.

त्याचे कौतुक केले पाहिजे, पण ज्यांना बाळासाहेबांपेक्षा आपण मोठे व्हावे, आपलेच फोटो लागले पाहिजे, असे वाटते त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. बाळासाहेबांनी लोकांना स्वाभीमानाने जगायला शिकवले, याचा आम्हाला अभिमान आहे. आदित्य ठाकरे यांच्या बोलण्याला जास्त महत्व देत जावू नका, त्यांची अक्कल तेवढीच आहे, अशी टीकाही शिरसाट यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in