गुंठेवारीतील घरे नियमित करतांना शुल्काचे हप्ते पाडून देऊ; नगरविकास मंत्र्यांचे आश्वासन

Minister Eknath Shinde saidThe Municipal Commissioner will be notified about the payment of fees (शुल्काचे हप्ते पाडून देण्याविषयी महापालिका आयुक्तांना सूचना केली जाईल)
गुंठेवारीतील घरे नियमित करतांना शुल्काचे हप्ते पाडून देऊ; नगरविकास मंत्र्यांचे आश्वासन
Minister Eknath ShindeSarkarnama

औरंगाबाद : गुंठेवारी कायद्याला मुदतवाढ देऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांची घरे नियमित होणार आहे. गुंठेवारीतील घरे नियमित करण्यासाठी आकारण्यात आलेल्या शुल्काचे हप्ते पाडून देण्याविषयी महापालिका आयुक्तांना सूचना केली जाईल, असे आश्‍वासन राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

पश्चिम विधानसभा मतदार संघातील चार रस्त्यांच्या व्हॉइट टॉपिंग कामांचे भुमीपूजन मंगळवारी (ता. २३) शिंदे यांनी केले. शहरासाठी राज्य सरकारने भरघोस निधी दिला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचा उपयोग देखील या शहराला होणार आहे. या महामार्गामुळे राज्यातील सर्व विभाग एकमेकांशी जोडले जाणार आहेत.

शहरात १५० कोटींचे रस्ते बनविण्यात आले, १६८० कोटी रूपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू झाले. राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत ५ हजार किलोमीटरचा अ‍ॅक्सेस रोड तयार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला जात आहे. कोरोना काळातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विकासकामाला कात्री लावलेली नाही.

रस्ते विकासाबरोबरच समृद्धी महामार्ग, वाळूज, शेंद्रा- बिडकीन व डीएमआयसीच्या औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून औरंगाबादची औद्योगिक प्रगतीकडे वाटचाल सुरु असल्याचे शिंदे म्हणाले. गुंठेवारी कायद्याची अंमलबजावणी केली जात असून नियमितीकरणासाठी आकारण्यात आलेल्या पैशाचे हप्ते पाडून देण्याबद्दल महापालिका प्रशासनाला सांगितले जाईल, असे सांगून लोकांना गुंठेवारीतील मालमत्ता नियमित करून घ्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

Minister Eknath Shinde
युवक काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यपदासाठी नेत्यांच्या मुलांमध्ये चुरस; मराठवाड्यातूनही दोघे इच्छूक

ठेकेदारांसाठी नाही लोकांसाठी काम करा

गारखेड्यातील शिवनेरी कॉलनीतील विजय चौक इथे रस्त्याचे चौथ्यांदा भुमीपूजन होत असल्याचे राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले. तेव्हा हाच धागा पकडून शिंदे म्हणाले, या रस्त्याच्या कामाचे पाचव्यांदा भूमिपूजन होणार नाही याची दक्षता घ्या.

रस्त्याचे काम दर्जेदार करा आणि वेळेत पूर्ण करा. निधीचा विनीयोग योग्य प्रकारे झाला पाहिजे. ठेकेदारांसाठी नव्हे तर लोकांसाठी काम करा. करोनाची तिसरी लाट येणार नाही याची काळजी देखील आपण सर्वांनी घेतली पाहीजे असे, आवाहनही शिंदे यांनी यावेळी केले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in