Amit Deshmukh : देशात, राज्यात जे चाललंय त्यावर बोलणार नाही, आम्ही विकासावर बोलतो..

माझ्या बाभळगाव येथे मोहरममध्ये डोला बसविला जातो. त्याला माझ्या घराचा नैवेद्य दाखल्याशिवाय तो सण पूर्ण होत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हा मान माझ्या कुटुंबाला आहे. (Amit Deshmukh)
Minister Amit Deshmukh
Minister Amit DeshmukhSarkarnama

औसा : गेल्या अनेक शतकांपासून भारतात बंधुभाव नांदतो आहे. त्याला संपविण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, प्रयत्न करणारे संपले पण आमचा जाती जाती, धर्माधर्मामध्ये असलेला भाईचारा त्यांना संपविता आला नाही. (Latur) समाजात दुरी निर्माण करून देशात आणि राज्यात एक प्रकारे वातावरण गढूळ करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे दुःख मला आहे. (Marathwada)

आपली एकजूट ही आपली शक्ती आहे तर फूट ही विनाशाकडे घेऊन जाणारी आहे. आज देशात आणि राज्यात जे चालले आहे त्यावर मी भाष्य करणार नाही. कारण तो विकासाचा मुद्दा नाही, आम्ही विकासावर बोलणारी माणसे आहोत आणि विकासाचा विचार करून त्यावर चालणारी आहोत, असा टोला राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी विरोधकांना लगावला.

रविवारी (ता.१) काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत ते बोलत होते. विरोधकांवर टीका करतांना श्री. देशमुख म्हणाले की, समाजा समाजात दुरी निर्माण करण्याचा प्रयत्न कांही समाजकंटकाकडून होत आहे. विकासावर बोलण्यापेक्षा ते भलत्याच विषयवार बोलून लोकांमधील बंधुभाव तोडण्याचा प्रयत्न करत आहेत.

स्वातंत्र्याच्या लढ्यापासून आपण एकत्र आहोत आणि राहू. गेल्या अनेक शतकापासून आपल्यातला भाईचारा संपविण्याचे याच समाजकंटकांनी प्रयत्न केले. ते संपले मात्र आमच्यातला स्नेह, बंधुभाव संपला नाही. माझ्या बाभळगाव येथे मोहरममध्ये डोला बसविला जातो. त्याला माझ्या घराचा नैवेद्य दाखल्याशिवाय तो सण पूर्ण होत नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून हा मान माझ्या कुटुंबाला आहे. त्याकडे आम्ही कधीही मुस्लिम समाजाचा सण म्हणून पाहिले नाही आणि तसा कधी विचारही आला नाही. हीच परंपरा असंख्य गावात अजूनही सुरू आहे. ती जपण्याची गरज असून बंधुभावाचा विचार करून तो पुढे आणण्याचीही गरज आहे. या एकसंघतेतच आपली शक्ती आहे. विभक्तता ही विनाशाकडे घेऊन जाणारी आहे.

Minister Amit Deshmukh
राज ठाकरेंच्या सभेनंतर असदुद्दीन ओवेसींची मोठी घोषणा

त्यामुळं कुठे काय चाललंय याचा विचार न करता अथवा कोणाच्या भूलथापांना बळी न पडता सर्वधर्म समभाव जपला पाहिजे. हीच शिकवण महात्मा गांधी यांनी दिली आहे आणि आम्ही ती स्वीकारली आहे. या विचारापासून आम्ही कधीही फारकत घेणार नाही. इस्लाम धर्माची शिकवण ही प्रेरणादायी असून त्यांच्यातली नीतिमूल्ये ही अखिल मानवी जीवनासाठी लाभदायक आहेत.

रमजान महिना सुरू आहे फक्त दुवा मे याद रखना, असे आवाहन करीत आमच्या पाठीशी उभे राहण्याची विनंतीही यावेळी केली. या इफ्तार पार्टीला जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष श्रीपती काकडे, नारायण लोखंडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शकील शेख यांच्यासह विविध पक्षाचे आणि समाजातील लोक उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com