आम्ही शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही ; पदाधिकाऱ्यांचे वचनपत्र

शिवसेना पक्षाच्या घटनेवर माझी पूर्णपणे निष्ठा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेले आदर्श तत्व तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील आमचा पुर्ण विश्वास. (Parbhani Shivsena)
Shivsena Parbhani News
Shivsena Parbhani NewsSarkarnama

परभणी : राज्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे, दररोज नगरसेवक, आमदार, खासदार,पदाधिकारी शिंदे गटात गेल्याच्या बातम्या धडकत आहेत. (Parbhani) पण अजूनही राज्यातील विविध भागातील पदाधिकारी, शिवसैनिक पक्षाशी इमान राखून आहेत. आज दिल्लीत (Shivsena) शिवसेनेच्या १८ पैकी १२ खासदारांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण उर्वरित सहा खासदारांमध्ये परभणीचे संजय जाधव यांचा समावेश असून त्यांनी आपण शेवटपर्यंत शिवसेनेची, उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, असा शब्द दिला आणि ते तसे वागले देखील.

आता त्यांच्या मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेना व (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांना न सोडण्याचा निर्धार केला आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर पाथरी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी चक्क शंभर रुपयांच्या बाॅन्ड पेपरवर तसे वचनपत्रच तयार केले आहे. शिवसैनिकांच्या या अनोख्या निष्ठेची सर्वत्र चर्चा होत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा असून त्यांना कधीही सोडणार नसल्याचे शंभर रुपयाच्या बॉण्ड पेपर वर लिहून दिले आहे.

एकीकडे शिवसेनेचे नेते पक्ष सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल होत असतांना दुसरीकडे पाथरी तालुक्यातील शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शंभर रुपयाच्या बॉण्ड वर शिवसेनेला न सोडण्याचे वचनपत्रच लिहून दिले आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील राजकारणात मोठे बदल घडत आहेत. राज्यभरात शिवसेनेचे नेते पक्ष सोडत असताना परभणी जिल्ह्यातील खासदार, आमदारा सह पदाधिकारी मात्र पक्षप्रमुखां सोबत ठामपणे उभे राहिले आहेत.

दरम्यान आज पाथरी तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व जुन्या शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भविष्यात ही आम्ही आपल्यासोबत राहू असे वचनपत्र लिहून दिले. शिवसेना पक्षाच्या घटनेवर माझी पूर्णपणे निष्ठा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेले आदर्श तत्व तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील आमचा पुर्ण विश्वास असल्याचे या वचनपत्रात नमूद करण्यात आले आहे.

Shivsena Parbhani News
ज्या वटवृक्षाखाली वाढलो, त्याच्यावर घाव घालण्याची माझी प्रवृत्ती नाही ; मी ठाकरेंसोबतच..

शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, उपजिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, तालुकाप्रमुख मुंजाभाऊ कोल्हे, शहरप्रमुख राहुल पाटील, युवासेना तालुकाप्रमुख पांडुरंग शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य शरद कोल्हे, उप तालुकाप्रमुख तुकाराम हारकळ,सिद्धेश्वर इंगळे,अनिल शिवाजीराव नखाते यांच्यासह माजी जिल्हापरिषद पंचायत समिती सदस्य,माजी नगरसेवक,सर्कल प्रमुख, उपसर्कल प्रमुख यांचे सह शेकडो जुन्या शिवसैनिकांनी हे वचनपत्र दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com