Jyoti Mete : विनायकरावांच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्योती मेटेंनी हाती घेतलेल्या चळवळीला बळ देणार : फडणवीसांनी दिला शब्द

त्यावेळी मला येता आले नाही. आज आलो; परंतु दुर्दैवाने विनायकराव मेटे आपल्यात नाहीत.
Jyoti Mete : Devendra Fadnavis
Jyoti Mete : Devendra FadnavisSarkarnama

बीड : दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे (Vinayak mete) यांनी व्यसनमुक्त अभियानाची सुरुवात करुन मुख्यमंत्री असताना मला बोलविले. मात्र, त्यावेळी मला येता आले नाही. आज आलो; परंतु दुर्दैवाने विनायकराव मेटे आपल्यात नाहीत. मात्र, विनायकराव मेटे यांनी हाती घेतलेली चळवळ डॉ. ज्योती मेटे (Jyoti Mete) पुढे चालवत आहेत. या चळवळीला सरकार म्हणून राज्यभर बळ दिले जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. (We will give strength to movement undertaken by Jyoti Mete : Devendra Fadnavis)

दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या पुढाकाराने शहरात दरवर्षी ३१ डिसेंबरला व्यसनमुक्ती जनजागृती फेरी व संगीत रजनी घेऊन गोड दूध पाजले जात होते. यंदा डॉ. ज्योती मेटे यांच्या पुढाकाराने अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी (ता. ३१ डिसेंबर) व्यसनमुक्ती जनजागृती फेरी काढून त्याचा समारोप देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला.

Jyoti Mete : Devendra Fadnavis
Kshirsagar News : क्षीरसागर काका-पुतण्याच्या लढाईत आमदार सोळकेंची पुतण्याला खंबीर साथ!

या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री अतुल सावे, डॉ. ज्योती मेटे, शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, उपाध्यक्ष राजन घाग, प्रभाकर कोलंगडे, नारायण काशिद, रामहरी मेटे, अशुतोष मेटे, बी. बी. जाधव, सुहास पाटील आदींची उपस्थिती होती.

Jyoti Mete : Devendra Fadnavis
Winter Session : पुण्याला पिंपरी-चिंचवड ठरले भारी : महेश लांडगे, सुनील शेळकेंची जोरदार बॅटिंग!

फडणवीस म्हणाले की, विनायकराव मेटे यांनी आपली हयात सामाजिक कामात घालविली. ते २४ तास समाजाचे काम करत असत. छत्रपती शिवाजी महाराजांचे आरबी समुद्रातील स्मारक, मराठा आरक्षण हे त्यांच्या मनातील मुद्दे होते. त्यांनी व्यसनमुक्त समाज व्हावा हा विडादेखील उचलला होता. आता त्यांचा वसा ज्योती मेटे यांनी हाती घेतला आहे. त्यांच्यामागे आपण खंबीरपणे उभे राहणार आहे.

Jyoti Mete : Devendra Fadnavis
Mangalveda News : मंगळवेढ्याचा समविचारी गट भाजपत जाणार की प्रशांत परिचारकांनाच राष्ट्रवादीत आणणार?

या वेळी चंद्रशेखर बावनकुळे, अतुल सावे, डॉ. ज्योती मेटे, तानाजी शिंदे यांची भाषणे झाली. आमदार सुरेश धस, आमदार लक्ष्मण पवार, रमेश आडसकर, भीमराव धोंडे, किरण पाटील, अशोक हिंगे, कुंडलिक खांडे, रमेश पोकळे, अक्षय मुंदडा, राजेंद्र मस्के आदी उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितीतांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. तत्पूर्वी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथून जनजागृती फेरी निघाली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी फेरीला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी डॉ. ज्योती मेटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, तरुण, महिलांचा मोठा सहभाग होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com