Santosh Danve : दोन मुली असल्याने लोक फोन करून विचारतात, भाऊ आता कसं..

हे सांगण्या मागे हेतू हाच की आपण मुला-मुलीमध्ये भेद न करता दोघांना समान वागणूक आणि शिक्षण दिले पाहिजे. (Mla Santosh Danve)
Bjp Mla Santosh Danve In Tiranga Rally News Jalna
Bjp Mla Santosh Danve In Tiranga Rally News JalnaSarkarnama

जालना : देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पुर्ण झाली आहेत, तरी देखील देशात मुलगा-मुलगी असा भेदभाव केला जातो. मुलगी असेल तर मुलाचा आग्रह धरला जातो. शिक्षणात मुलाला प्राधान्य दिले जाते. (Jalna) मला दोन मुली आहेत, लोक मला फोन करून विचारतात, भाऊ आता कसं. मला समजत नाही लोक मला मुली झाल्या म्हणून आनंदाने फोन करतात, की सांत्वन करायला, असा टोला लगावत भाजप आमदार संतोष दानवे (Santosh Danve) यांनी मुला-मुलीत भेदभाव करू नका, असे आवाहन उपस्थितांना केले.

आमदाराला तिसर आपत्य चालते, पण माझा तसा काही विचार नाही, अशी मिश्किल टिपण्णी देखील दानवे यांनी यावेळी केली. (Marathwada) १५ आॅगस्ट ७५ व्या स्वातंत्र्यदिना निमित्त संतोष दानवे यांच्या नेतृत्वाखाली भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघात तिरंगा यात्रा काढण्यात आली होती. माहोरा येथे या यात्रेचा समारोप झाला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना दानवे यांनी देशाची प्रगती, वैभव, भौगोलिक परिस्थितीत झालेले बदल, शिक्षण पद्धती आणि वाटचाल या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पुर्ण होत असली तरी अजूनही मुलगा-मुलगी भेद काही कमी होत नाही, अशी खंत दानवे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, शिक्षणाच्या बाबतीत आजही आपण मुला-मुलीमध्ये भेदभाव करतो. समजा संतोष दानवेला एक मुलगा एक मुलगी आहे, तर तो मुलगा शिकला पाहिजे याला प्राधान्य देतो. कारण मुलगा हा कुटुंबाचा आधार आणि वारसदार असतो, मुलगी शिकून लग्न करून सासरी निघून जाणार असते.

हा विचार आता सोडून दिला पाहिजे. मुला प्रमाणेच मुलीला देखील शिक्षण आणि तिला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी दिली पाहिजे. मला दोन मुली आहेत, जेव्हा मला दुसरी मुलगी झाली तेव्हा माझ्यापेक्षा इतरांनाच जास्त काळजी वाटत होती. अनेकांनी मला फोन करून दुसरी मुलगी झाली तेव्हा विचारणा केली. एवढे फोन आले, ते सगळे हेच विचारायचे भाऊ आता पुढे कसं.

Bjp Mla Santosh Danve In Tiranga Rally News Jalna
Assembly Session : शिरसाट, शेलारांच्या मंत्रीपदासाठी मुंडेची घोषणाबाजी..

मला समजत नव्हतं की हे माझं अभिनंदन करायसाठी फोन करतायेत का सात्वंनासाठी. मी त्यांना म्हणालो, आमदाराला तिसरे आपत्य चालतं, पण माझा सध्या तसा काही विचार नाही. हे सांगण्या मागे हेतू हाच की आपण मुला-मुलीमध्ये भेद न करता दोघांना समान वागणूक आणि शिक्षण दिले पाहिजे, असे आवाहन देखील दानवे यांनी शेवटी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com