Beed : आम्ही क्षीरसागर एकाच छताखाली राहतो, पण एकमेकांचे चेहरेही पाहत नाही..

आजही क्षीरसागर बंधू, त्यांचे पुतणे, सुना सर्व एकाच छताखाली राहातात आणि किचनही एकच आहे हे विशेष. (Beed News)
Yogesh Kshirsagar-Mla Sanip Kshirsagar,Beed
Yogesh Kshirsagar-Mla Sanip Kshirsagar,BeedSarkarnama

बीड : आम्ही आजतरी एका छताखाली राहतो, पण आम्ही एकमेकांचे चेहरेही पाहत नाही, मलाही अनेकजण विचारतात, पण घर म्हणून एकत्र असलो तरी आमचे परस्पर संबंध काहीच नाहित, असे खुद्द माजी नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागर म्हणाले. (Beed) दिवभरात एखाद्या वेळेस येता - जाता क्रॉसिंग होत असेल तेच काय, असा खुलासाही त्यांनी केला.(Marathwada)

दिवंगत लोकनेत्या केशरबाई क्षीरसागर यांच्यापासून जिल्ह्याच्या राजकारणात क्षीरसागरांची मांड घट्ट आहे. (Kshirsagar) क्षीरसागरांचा नगर रोडचा ‘बंगला’देखील राजकारण शब्द माहित असलेल्या प्रत्येकालाच परिचीत. अगदी जिल्ह्यातल्या राजकारणात बंगला म्हणजे क्षीरसागरांचा असे अलिखीत समिकरणच आहे.

दरम्यान, पाच वर्षांपासून क्षीरसागरांमध्ये राजकीय संदोपसुंदी सुरु आहे. अलिकडे तर राजकीय वर्चस्ववादाला मालमत्तेची झालर लागल्याने जिवे मारण्याचा प्रयत्न, भारतीय हत्यार कायदा, दरोडा अशा कलमांखाली दोन्ही गटांच्या समर्थकांनी एकमेकांवर गुन्हे नोंद केले आहेत. गुन्हे नोंद झालेल्या १६ जणांत क्षीरसागरांच्या बंगल्यातील पाच जण आहेत.

आजही क्षीरसागर बंधू, त्यांचे पुतणे, सुना सर्व एकाच छताखाली राहातात आणि किचनही एकच आहे हे विशेष. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा नोंद झालेल्या माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर व त्यांचे पुत्र डॉ. योगेश क्षीरसागर यांना न्यायालयाने अंतरिम जामिन दिला आहे. त्याबाबत योगेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेऊन गुरुवारी भूमिका मंडली.

Yogesh Kshirsagar-Mla Sanip Kshirsagar,Beed
औरंगाबाद महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा, तरी भावी नगरसेवक `गॅस`वरच..

यात एका घरात राहण्यावरुन निघालेल्या विषयावर त्यांनी वरिल खुलासा केला. सर्व क्षीरसागर एकत्रच राहतात पण बाहेर भांडणे दाखवितात, त्यामुळे आपण एकच आहात का? त्यांचे आतुन मिटले का, असे लोक विचारतात, असे डॉ. योगेश क्षीरसागर म्हणाले. मात्र, आम्ही काही सिनेस्टाईल एकमेकांकडे पाहत नाही, काकुंचे कुटुंब असल्यामुळे एका छताखाली राहतो, पण एकमेकांशी कधी बोलतही नाही.

फक्त येता - जाता क्रॉसिंग होते तेवढेच काय असेही त्यांनी नमूद केले. व्यक्तीगत माझे कुटूंब व वडिल सकाळी एकदा बाहेर पडलो कि बाहेरच्याच कामांत असतो. दुपारी जेवणेही कामांच्या ठिकाणीच होते. त्यामुळे फार जाणे-येणेही नसते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com