डोळे वटारले तर ते काढण्याची आमच्यात हिंमत ; राष्ट्रवादीच्या दांडेगावकरांचा शिवसेनेला इशारा

(Shivsena-Ncp Clashes In Hingoli) शिवसेना खासदार, आमदारांचे हात अवैध धंद्यांनी बरबटलेले आहेत. मटका आणि वाळूत बरबटलेल्या हातांनी ते पुतळा निर्मळ कसे करणार?
Dandegaonkar-Mp Hemant Patil-Mla Santosh Bangar
Dandegaonkar-Mp Hemant Patil-Mla Santosh BangarSarkarnama

हिंगोली : जलाभिषेक करणाऱ्याचे हात अवैध धंद्यांनी बरबटलेले असून त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोला राष्ट्रवादीचे नेते जयप्रकाश दांडेगावकर यांनी केली. राष्ट्रवादीचे आमदार नवघरे यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला घोड्यावर चढून हार घातल्याचे निमित्त करत शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील ,आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या टीकेला दांडेगावकर यांनी प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने आयोजित आरोग्य शिबीरात त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

आमदार राजू नवघरेची चुकी नसतानाही त्यांनी जाहीर माफी मागितली. तरी शिवसेनेचे काही लोकप्रतिनिधी जाणून बुजून याचे राजकारण करीत आहेत. त्यांना एवढेच सांगायचे आहे की तुम्ही ज्या हाताने छत्रपती शिवाजी महाराजांचा जलाभिषेक करीत आहात, ते तुमचे हात अवैध धंद्यांनी बरबटलेले आहेत. नवघरे तुम्ही कदापी नाउमेद होऊ नका, तुमचे सामाजिक कार्य जोमाने चालू राहू द्या, बाकी काय ते मी सांभाळून घेतो, अशा शब्दात त्यांनी आमदार नवघरे यांची पाठराखण केली.

गिरगाव येथे राजू नवघरे सेवा प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गिरगाव सर्कल यांच्या वतीने माजी मंत्री तथा राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, राजू आमदार नसतानाही सामाजिक कार्यक्रम करीत होता, आमदार झाल्यावरही हे कार्य चालूच आहे. पण आमदार कोणत्याच चुकीत सापडत नाही म्हटल्यावर त्यांच्याकडून नजर चुकीने झालेल्या प्रकाराचे भांडवल केले गेले.

नकळत झालेल्या चुकीसाठी माफी मागूनही काही लोक यांचे राजकारण करतात. ते चुकीचे आहे, राजूच्या पाठीशी राष्ट्रवादी कांग्रेस ठामपणे उभी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे जलाभिषेकाने शुद्धीकरण करण्यासाठी निघालेल्या शिवसेना खासदार, आमदारांचे हात अवैध धंद्यांनी बरबटलेले आहेत. मटका आणि वाळूत बरबटलेल्या हातांनी ते पुतळा निर्मळ कसे करणार? असा सवालही दांडेगांवकर यांनी केला.

Dandegaonkar-Mp Hemant Patil-Mla Santosh Bangar
जिल्हा बॅंकेच्या राजकारणातून दिलीप देशमुख निवृत्त, पुतण्या धीरजला दिली संधी

बिनकामाचे आमच्यावर डोळे वटाराल तर ते काढण्याची ताकद आमच्यात आहे, असा गर्भीत इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. शिवसेनेचे जे नेते आता छत्रपती शिवाजी महारांजाबद्दल प्रेम दाखवत आहेत, त्यांनी महाराजांचा एखादा पुतळा कधी उभा केलाय का? पण राजू नवघरेंची लोकप्रियता सहन होत नसल्यानेच विरोधकांकडून नको त्या गोष्टीचे भांडवल केले जात आहे, असा आरोपही दांडेगावकर यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com