कायदा मोडायचा नाही, पण आम्ही आता तर मुंबईला येणारच

(MP Imtiaz Jalil's appeal to come together on reservation issue by setting aside party flag) आम्ही औरंगाबादेत त्रिपुरा घटनेचे पडसाद उमटू दिलेले नाही, मुंबईत देखील कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. मग आमच्या मोर्चाला परवानगी नाकारायचे कारण काय?
कायदा मोडायचा नाही, पण आम्ही आता तर मुंबईला येणारच
Aimim Mp Imtiaz JalilSarkarnama

औरंगाबाद ः सत्ताधारी शिवसेना, काॅंग्रेस, राष्ट्रवादीचे नेते राज्यभरात फिरत आहेत, कुठल्याही परवानगी शिवाय सभा, मेळावे, मोर्चे काढत आहेत. मग सत्ताधारी पक्षांसाठी वेगळा आणि एमआयएमसाठी वेगळा कायदा आहे का? तर असे असू शकत नाही. त्यामुळे आमच्या मागण्या मांडण्यासाठी रसत्यावर उतरणे हा आम्हाला घटनेने दिलेला अधिकार आहे, तो आमच्यापासून कुणी हिरावू शकत नाही.

आम्ही मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत मोर्चा काढण्याची परवानगी पोलिस प्रशासनाकडे मागितली होती, त्यांनी ती नाकारली आहे. मी स्वतः पुन्हा मुंबईत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना भेटून विनंती करणार आहे. आम्हाला कायदा मोडायचा नाही, पण तुम्ही आमच्यावर जबरदस्ती देखील करू नका, आता तर आम्ही मुंबईला येणारच, असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पोलिस प्रशासनाला दिला आहे.

मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा घेऊन मुंबईत भव्य मोर्चाचे आयोजन एमआयएमच्या वतीने करण्यात आले आहे. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी, खासदार इम्तियाज जलील यांनी या मोर्चाच्या पुर्वतयारीसाठी नुकतीच औरंगाबादेत राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक देखील घेतली. दोन दिवसांपुर्वीच ओवेसी यांनी महाविकास आघाडी सरकारला येत्या हिवाळी अधिवेशान मुस्लीम आरक्षणाचे विधेयक आणा, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला होता.

मुंबईत मोर्चा काढण्याची एमआयएमची जोरदार तयारी झालेली असली तरी त्रिपुरा घटनेचे पडसाद नांदेड, मालेगाव व अमरावती शहरात उमटून हिंसक घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिासंनी एमआयएमला मोर्चा काढण्यास परवानगी नाकारली आहे. यावर इम्तियाज जलील यांनी आक्षेप घेत सत्ताधारी नेत्यांच्या सभा, मेळावे आणि मोर्चांवर बोट ठेवत आम्ही मुंबईला येणारच असे आव्हान पोलिसांना दिले आहे.

Aimim Mp Imtiaz Jalil
राणे म्हणतात, ''अजितदादांकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्या''

सोशल मिडियाच्या माध्यमातून इम्तियाज जलील यांनी राज्यभरातील सर्वपक्षीय मुस्लिम कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांना पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून आरक्षणाच्या मुद्यावर एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. इम्तियाज जलील म्हणाले, अजित पवार, संजय राऊत, शरद पवार, नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांच्या सभा, मेळावे, मोर्चे राज्यभरात होत आहेत. शिवसेनेने तर महागाईच्या विरोधात विनापरवानगी मोर्चा काढला.

अमरावतीत दंगल आमच्यामुळे नाही..

आम्ही रितसर परवानगी मागितली तर अमरावतीचे कारण देऊन ती नाकारण्यात आली. अमरावती, नांदेड, मालेगांवमधील घटना या आमच्यामुळे घडलेल्या नाहीत. तेथील पोलिस प्रशासन व राजकीय संघटना त्याला जबाबदार आहेत. त्यांच्यावर जी कारवाई करायची ती करा. आम्ही औरंगाबादेत त्रिपुरा घटनेचे पडसाद उमटू दिलेले नाही, मुंबईत देखील कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. मग आमच्या मोर्चाला परवानगी नाकारायचे कारण काय?

मुस्लीम आरक्षणासाठीचा हा मोर्चा असणार आहे. कुठल्या एका पक्षाचा तो नाही, या मोर्चा राजकीय पक्षाचे किंवा एमआयएमचा झेंडा देखील असणार नाही, कर देशाचा तिरंगा घेऊन आम्ही आमच्या मागण्या सरकारकडे मांडणार आहोत. राज्यातील सर्व राजकीय पक्षांतील मुस्लिम पदाधिकारी, कार्यकर्त्यांना देखील माझे आवाहन आहे, की त्यांनी पक्षाचा गळ्यातील रुमाल बाजूला ठेवून या मोर्चात सहभागी व्हावे, एकजूट दाखवावी.

निवडणूका आल्यानंतर तुम्ही पुन्हा तुमच्या मार्गाने जा. येत्या दोन-तीन दिवसांत मोर्चाची तारीख मी जाहीर करणार आहे. आम्हाला कायदा मोडायचा नाही, पण कुणी दाबण्याचा प्रयत्न देखील करू नये. आम्ही शांततेत मोर्चा काढणार आहोत, त्यामुळे आता तर मुंबईला जाणारच, याचा पुनरुच्चार देखील इम्तियाज जलील यांनी केला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in