Shivsena : आम्ही ओरिजनल, यायचं असेल तर ते पुढे येतील ; शिरसाटांसोबत उभे राहणे खैरेंनी टाळलेच..

डाॅ.कराडांनी त्यांचा हात धरत त्यांना जरा थांबा, शिरसाटांच्या शेजारी उभे राहा, अशी विनंती केली. पण खैरेंनी ती धुडाकवली. (Chandrakant Khaire)
Save-Shirsat-Khaire-Karad In Aurangabad News
Save-Shirsat-Khaire-Karad In Aurangabad NewsSarkarnama

औरंगाबाद : राज्यातील सत्तांतरानंतर उद्धव सेना विरुद्ध शिंदे सेना असा संघर्ष ठिकठिकाणी पहायला मिळतोय. गणेश विसर्जनाची मिरवणुक देखील त्याला अपवाद ठरली नाही. राज्यात विविध ठिकाणी हे दोन्ही गट समोरासमोर आल्याने वादाला तोंड फुटले. (Aurangabad) औरंगाबादेत गणपती विसर्जन मिरवणुकीत वेगळेच चित्र पहायला मिळाले. ज्या भाजपने शिंदेंच्या माध्यमातून शिवसनेला सुरुंग लावला त्या भाजप नेत्यांसोबत (Shivsena) शिवसेनेचे पदाधिकारी उभे राहायला तयार होते, पण ज्या आमदार, नेत्यांसोबत ३५-४० वर्ष मांडीला मांडी लावून काम केले, त्यांचे मात्र त्यांना वावडे होते.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी आमदार संजय शिरसाट यांना पाहून पुढे निघून जाणाऱ्या खैरेंचा हात धरून त्यांना शिरसाट यांच्या शेजारी उभे करण्याचा प्रयत्न केला. पण (Chadrakant Khaire) खैरेंनी आम्ही ओरिजनल आहोत, यायचे असेल तर ते पुढे येतील असे म्हणत शिरसाट यांच्यासोबत उभे राहणे टाळले. तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शेजारी उभे राहून ढोलच्या तालावर ताल धरतांना दिसले.

विसर्जन मिरवणूकीतील हे चित्र त्यांच्या समर्थकांना मात्र सुखावणारे होते. गणपती विसर्जन मिरवणूकीत काल राजकीय नेत्यांची रेलचेल दरवर्षी प्रमाणे दिसून आली. पण राज्यातील सत्तांतर, पक्षाला लागलेला सुरुंग या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप आणि आता शिंदे गट हे एकमेकांपासून अंतर राखून होते. शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थान गणपती मंदिरापासून दुपारी दोन वाजता विसर्जन मिरवणूकीला प्रारंभ झाला.

गणपतीची आरती केल्यानंतर मिरवणुकीच्या पहिल्या रथाला शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे यांनी ओढत मार्गस्थ केले. पुढे काही अंतरावर या मिरवणुकीत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल हे देखील जोडले गेले. ढोल-ताशे बॅन्डच्या तालावर गणेशभक्त बेभान होऊन नाचत असतांना राजकीय नेते हातात हात घालून काही अतंरापर्यंत मिरवणूकीत चालत गेले.

Save-Shirsat-Khaire-Karad In Aurangabad News
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर अपशकुन नको म्हणून शांत होतो: रविंद्र गायकवाड

शिंदे गटातील आमदारांना गद्दार म्हणत त्यांच्यावर टीकेची झोड उठवणारे चंद्रकांत खैरे शिरसाटांना पाहून पुढे निघाले. तेव्हा डाॅ.कराडांनी त्यांचा हात धरत त्यांना जरा थांबा, शिरसाटांच्या शेजारी उभे राहा, अशी विनंती केली. पण खैरेंनी ती धुडाकवत मी कशाला थांबू, याययचे असेल तर तो पुढे येईल, आम्ही ओरिजनल आहोत, असा टोला लगावला. त्याला शिरसाट यांनी स्मितहास्य करत प्रतिसाद दिला, पण खैरे काही शिरसाटांजवळ उभे राहिलले नाही, ते पुढे निघून गेले.

तर तिकडे अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल एकमेकांच्या शेजारी उभे होते. पण एकमेकांशी न बोलता त्यांनी ढोल-ताशांच्या तालावर ताल धरला होता. एकंदरित शिंदे गटाशी कुठल्याही परिस्थितीत समझोता नाही, अशी भूमिका शिवसेना नेत्यांनी घेतल्याचे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com