केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर, तर आम्ही विकासाची गंगा घरोघरी नेत आहोत..

काही दिवसांपूर्वी दहा हजार रुपये प्रतिक्विंटल असलेला बाजारभाव सध्या घसरला आहे. सोयाबीन पेंड आयात करण्यासाठी चर्चा झाली अन् भाव गडगडले. (Minister Amit Deshmukh)
Amit Deshmukh

Amit Deshmukh

Sarkarnama

देवणी ः विकासाची गंगा सर्वसामान्यापर्यंत नेण्याचे काम आम्ही करीत आहोत, तेव्हा महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन पालकमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी केले. (Latur) नगरपंचायत निवडणुकीच्या अंतिम टप्यातील प्रचारात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप (Bjp) असा कलगितुरा चागंलाच रंगला आहे.

लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडून विकास केल्याचा दावा केला जात आहे, तर विरोधक असलेले आमदार संभाजी पाटील निलंगेकर त्यांचा हा दावा खोडून काढत आहेत. आत मतदार कुणाच्या बाजूने आपला कौल देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. देवणी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत अमित देशमुख यांनी भाजप व केंद्र सरकारवर टिका केली.

देशमुख म्हणाले, आरक्षणाच्या खेळाला जबाबदार कोण ? आरक्षणाची चर्चा अनेक वर्षांपासून आपण ऐकतो. मात्र, आरक्षण कोणाच्याच पदरात पडलेला नाही. गल्ली ते दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता राहिली, त्या काळात आरक्षणासंदर्भात त्यांनी काहीही केले नाही. सोयाबीन हे आपल्या भागातील महत्त्वाचे पीक आहे. या पिकामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नती आली.

काही दिवसांपूर्वी दहा हजार रुपये प्रतिक्विंटल असलेला बाजारभाव सध्या घसरला आहे. सोयाबीन पेंड आयात करण्यासाठी चर्चा झाली अन् भाव गडगडले. केंद्राच्या चुकीची धोरणानेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, अशी टीकाही देशमुख यांनी केली.

<div class="paragraphs"><p>Amit Deshmukh</p></div>
चाळीस वर्षांत साधे शौचालयही बांधू न शकणारे विकासाच्या गप्पा मारतात

बोलतो ते करणारा मी कार्यकर्ता आहे. तुम्ही आमच्या सोबत असले तर आम्ही तुमची सेवा करू. आम्ही देवणीला मुबलक कायमस्वरूपी पाणी पुरवठा करू,असे आश्वासन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनीही यावेळी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com