बुलडाणा हा बिहार नाही; हल्ल्याचा उद्रेक संपूर्ण जिल्ह्यात होईल : शिवसेनेचा इशारा

बुलडाण्याचे ठाणेदार कोणत्या आमदाराच्या शिफारशीवर येथे आले आहेत, याचीही आम्हाला कल्पना आहे,
Buldana shivsena attack
Buldana shivsena attackSarkarnama

बुलडाणा : बुलडाणा (Buldana) हा बिहार नाही. पोलिसांनी योग्य कार्यवाही न केल्यास संपूर्ण बुलडाणा जि्ल्ह्यात याचा उद्रेक उमटेल, असा इशारा शिवसेनेचे (shivsena) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांनी दिला. दरम्यान, शिवसेनेच्या कार्यक्रमात हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी सभागृहात येऊ दिले, त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. बुलडाण्याचे ठाणेदार कोणत्या आमदाराच्या शिफारशीवर येथे आले आहेत, याचीही आम्हाला कल्पना आहे, असा आरोप शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी केला. (Warning to Shiv Sena MLA Sanjay Gaikwad over the attack in Buldana)

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कल्याण गायकवाड आणि त्यांचे कार्यकर्ते सभागृहात आले. त्या वेळी गायकवाड यांच्या गटाकडून हल्ला करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. या वेळी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Buldana shivsena attack
शिवसेनेच्या कार्यक्रमात आमदार गायकवाडांच्या पुत्रासह कार्यकर्त्यांचा राडा; मारहाण झाल्याचा आरोप

दरम्यान, घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी तातडीने भेट देत पाहणी केली. या वेळी त्यांनी जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत आणि वरिष्ठ पदाधिकारी दत्ता पाटील यांच्याशी चर्चा करत शिवसैनिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. बुलडाणा बाजार समिती परिसरात तणावसदृश्य असल्याने शीघ्र कृती दलासह पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे.

Buldana shivsena attack
मोठी बातमी : नीतीशकुमार घेणार शरद पवारांची भेट; विरोधकांची रणनीती ठरणार

याबाबत शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर म्हणाले की, या प्रकरणात बुलडाणा शहर पोलिसांनीही बघ्याची भूमिका घेतली होती, तर शीघ्रकृती दलाच्या जवानांची भूमिकाही संशयास्पद होती. बुलडाण्याचे ठाणेदार हे कोणत्या आमदाराच्या शिफारशीवर बुलडाण्यात आले आहेत, हे आम्हाला माहिती आहे. हल्ल करणाऱ्यांजवळ हत्यारे होती. तसेच पोलिस हे सत्तेत असणाऱ्यांनाच मदत करत होते, असा आरोपही खेडेकर यांनी केला. आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड हेही या हल्ल्यात सहभागी होते. आपण त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, असेही प्रा. खेडेकर यांनी स्पष्ट केले. हल्ला करणारे नारेबाजी करत सभागृहापर्यंत आले, त्यामुळे पोलिसांची भूमिकाही संशयास्पद वाटते, असा आरोपही खेडेकर यांनी केला.

Buldana shivsena attack
...तर आम्ही त्यांच्यासोबत एकत्र येण्यास तयार : अशोक चव्हाणांबाबत दानवेंचे वक्तव्य

बुलडाणा हा बिहार नाही. कितीही हल्ले केले तरी आम्ही थांबणार नाही. शिवसेनेचे काम करतच राहू. आम्ही पोलिस प्रशासनाची वाट पाहणार आहोत. हल्ले करणाऱ्यांची नावेही पोलिसांना देण्यात येणाऱ्या अहवालामध्ये देणार आहोत. पोलिसांनीही योग्य कार्यवाही न केल्यास संपूर्ण जि्ल्ह्यात याचा उद्रेक उमटेल, असा इशाराही शिवसेना जिल्हाप्रमुख बुधवंत यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in