Munde V/s Munde News : `जवाहर` साठी मतदान झाले ; पण उद्या मतमोजणी, निकाल जाहीर होणार नाही..

Beed : पुढील आदेशापर्यंत मतमोजणीवर बंदी घालण्यात आलेली आहे
Dhananjay Munde - Pankaja Munde News
Dhananjay Munde - Pankaja Munde NewsSarkarnama

Marathwada : दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचे कायम वर्चस्व राहिलेल्या आणि बारा वर्षानंतर पहिल्यांदाच मतदान होत असलेल्या परळीतील जवाहर एज्युकेशन सोसायटीसाठी आज शांततेत पार पडले. आता निकाल काय लागणार? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. उद्या होणारी मतमोजणी न्यायालयाच्या आदेशाने थांबवण्यात आली आहे. त्यामुळे आता मतमोजणी आणि निकाल न्यायलायचा पुढील आदेश आल्यानंतरच केली जाणार आहे.

Dhananjay Munde - Pankaja Munde News
Sandipan Bhumre On Loksabha Seat : भुमरेंनी परस्परच ठरवले, लोकसभेची जागा लढवणार ; भाजपला दुसरी देणार..

३४ संचालक असलेल्या या संस्थेवर पंकजा (Pakaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) हे पुर्वीच बिनविरोध निवडून गेले आहेत. उर्वरित ३२ संचालकांसाठी आज शांततेत मतदान पार पडले. १२२१ मतदारांपैकी ८०१ व १० सहायक सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. (Parli) एकमेकांचे राजकीय विरोधक असलेल्या पंकजा आणि धनंजय मुंडे या बहिण भावासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

दोन्ही बाजूने मतदारांना मतदानासाठी आणण्याचे जोरकस प्रयत्न झाले. पकंजा मुंडे मतदान केंद्रावर थांबून होत्या. धनंजय मुंडे यांनी देखील दुपारी तीनच्या सुमारास आपल्या मतदानाचा हक्क बजावला. परळी शहरातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थेची निवडणूक म्हणून याची चर्चा जिल्हाभरात व राज्यात देखील होत आहे. आज नव्या नियमाक मंडळासाठी शांततेत मतदान पार पडले.

१२२१ पैकी ८११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आमदार धनंजय मुंडे यांनीही दुपारी मतदानाचा हक्क बजावला. परंतु मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला हे समजण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत मतमोजणीवर बंदी घालण्यात आलेली आहे. जवाहर एज्युकेशन सोसायटीची निवडणूक बारा वर्षांपूर्वी झाली होती.

प्रदीप खाडे यांचा ४१ (अ) चा अर्ज वैध ठरवून जवाहर एज्युकेशन सोसायटीची निवडणूक घेण्याचे आदेश देत निवडणूक अधिकारी म्हणून द.ल.सावंत यांची नियुक्ती केल्यानंतर सावंत यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यात हयात सभासदांतून ३१,आश्रयदाता सभासदांतून १, हितचिंतक १ व सहाय्यक सभासदातून १ असे ३४ संचालक निवडले जाणार होते.

Dhananjay Munde - Pankaja Munde News
Dhnanjay-Pankaja Munde News : `जवाहर`, साठी मतदान सुरू, मुंडे बहिण-भाऊ पुन्हा आमने-सामने...

यामध्ये आश्रयदाता गटातून आमदार धनंजय मुंडे व हितचिंतक गटातून पंकजा मुंडे बिनविरोध निवडून आले आहेत. तर उर्वरित ३२ जागेसाठी आज मतदान झाले. मतमोजणी रविवारी (ता.७) होणार होती मात्र न्यायालयाने मतमोजणी प्रक्रियेवर बंदी घातलेली आहे. आज झालेल्या मतदानात १,२२१ मतदारांपैकी ८११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये हयात सभासदांतून १,२११ पैकी ८०१ तर सहाय्यक सभासद १० पैकी १० जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com