व्हायरल ऑडिओ क्लीप उद्धव ठाकरेंच्या चमच्यांचीच, लवकरच उघड करू...

मी कार्यकर्त्यांना सांभाळतो ते मला सांभाळतात. कुणाला साधा चहा नाही कि गाडी नाही, सगळे माझ्यावरील प्रेमामुळे सभेला येणार आहे. (Minister Sandipan Bhumre)
Minister Sandipan Bhumre News, Aurangabad
Minister Sandipan Bhumre News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पैठण मधील सभेपुर्वी एक आॅडिओ क्लीप व्हायरल झाली. यामध्ये सभेसाठी महिलांना अडीचशे ते तीनशे रुपये देण्याचा उल्लेख आहे. यावरून (Shivsena) शिवसेनेकडून राहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर टीका देखील केली जात आहे. परंतु व्हायर झालेली आॅडिओ क्लीप ही उद्धव ठाकरेंच्या चमच्यांचीच आहे. (Paithan) त्यांनीच तयार करून ती व्हायरल केली आहे. त्या भामट्यांना लवकरच समोर आणतो, याची चौकशी करतो, अशा शब्दात संदीपान भुमरे यांनी आॅडिओ क्लीप आपल्या कार्यकर्त्यांची नसल्याचे स्पष्ट केले.

खैरे (Chandrakant Khaire) यांनी आता राजकारण सोडावे, २५ वर्षात त्यांनी शहराचे आणि जिल्ह्याचं वाटोळं केल, असा आरोप देखील भुमरे यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार आणि जाहीर सभा पैठणमध्ये होत आहे. या सभेची जय्यत तयारी भुमरे यांच्याकडून करण्यात आली आहे. परंतु तत्पुर्वी व्हायरल झालेल्या आॅडिओ क्लीपवरून वाद निर्माण झाला.

शिवसेनेने भुमरे यांच्यावर सरकारी यंत्रणांचा गैरवापर व पैसे वाटप करून सभेला गर्दी जमवल्याचा आरोप केला. यावर भुमरे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत ही क्लीप म्हणजे उद्धव ठाकरेंच्या चमच्यांचेच काम असल्याचे म्हटले आहे. क्लीपमधील संभाषण करणारे कार्यकर्ते देखील त्यांचेच आहे. पण त्यांनी कितीही आरोप केले तरी आम्हाला पैसे देवून गर्दी जमवण्याची गरज नाही.

मी कार्यकर्त्यांना सांभाळतो ते मला सांभाळतात. कुणाला साधा चहा नाही कि गाडी नाही, सगळे माझ्यावरील प्रेमामुळे सभेला येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेला एवढी गर्दी होणार आहे की तिथे बसायला रिकामी खुर्ची भेटणार नाही. मग उद्धव ठाकरेंना काय उत्तर द्यावे? या भितीतून त्यांच्या चमच्यांनी केलेला हा खोडसाळपणा आहे. पण त्याची चौकशी करून जे कोणी भामटे या मागे आहेत, त्यांना देखील समोर आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असा इशारा देखील भुमरे यांनी दिला.

Minister Sandipan Bhumre News, Aurangabad
ठाकरेंनी काय दिले विचारता, भुमरे तुम्ही हातापाया पडले आणि त्यांनी मंत्रीपद देवून टाकले..

शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंवर भुमरेंनी तोफ डागत त्यांना राजकारण सोडण्याचा सल्ला दिला. त्यांनी २५ वर्षात जिल्ह्याचे आणि शहराचे वाटोळे केले, आता त्यांनी शांत बसावे आणि पुजा-अर्चा करावी, असा टोला देखील भुमरेंनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com