Marathwada News : "शिवस्मारकाचा विनायकराव मेटे यांनी पाठपुरावा केला"

Vinayakrao Mete : नरेंद्र पाटलांनी काढली विनायकराव मेटेंच्या कार्याची आठवण
Narendra Patil
Narendra PatilSarkarnama

Narendra Patil : दिवंगत विनायकराव मेटे यांचा जिल्हा असल्याने बीडमध्ये आपले नेहमीच दौरे व्हायचे. शिवस्मारकाबाबतही दिवंगत विनायकराव मेटे यांनी सातत्याने पाठपुरावा केला, अशी आठवण अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी काढली.

नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी मंगळवारी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची आढावा बैठकीत विनायकराव मेटे यांची आठवण काढली. तसेच, पत्रकार परिषदेतही शिवस्मारक व मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरील उत्तरात त्यांनी आपसुक दिवंगत विनायकराव मेटे यांचे नाव काढले. आरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारणीसाठी विनायकराव मेटे यांनी कायम पाठपुरावा केला. मेटे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भूमिपूजन केले.

Narendra Patil
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड पिसाळलेले; त्यांच्या बापजाद्यांची हीच भूमिका का?; नरेंद्र पाटलांचा घणाघात

या विषयावर आणि मराठा आरक्षणाच्या विषयावर विनायकराव मेटे (Vinayakrao Mete) सभागृहात व सभागृहाबाहेर कायम बोलायचे. आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षण गेले तसेच शिवस्मारकाला खिळ बसल्याचेही नरेंद्र पाटील म्हणाले. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर शिवस्मारकाबाबत बैठक झाली आहे. लवकरच अधिकृत व्यक्तीची नियुक्ती केली जाईल, अशी ग्वाहीही पाटील यांनी दिली. तसेच सारथी व अण्णासाहेब पाटील महामंडळाचे काम सुरळीत सुरु झाल्याची माहिती पाटील दिली.

Narendra Patil
Shivsena News : मोठी बातमी : ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराला कोणत्याही क्षणी अटक होणार?

अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या अध्यक्षतेखाली तेव्हा मराठा आरक्षण उपसमिती असतानाच आरक्षण गेल्याने त्यांचा डीएनए तपासा, असे आपण तेव्हाही म्हणालो होतो, असे नरेंद्र पाटील म्हणाले.

सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे यांची समिती नेमून मराठा आरक्षण देण्याबाबत अभ्यासाच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. किमान मराठवाड्यातील समाजाला आरक्षण देता येईल का, सुप्रिम कोर्टाने आरक्षण नाकारल्याने पुढे काय, याचा अभ्यास सुरु असल्याचंही नरेंद्र पाटील यांनी माहिती दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com