Beed : विनायक मेटे प्रथमच सत्ता अन् आमदारकीविना ; त्यात ‘स्थानिक स्वराज्य’ च्या निवडणुका तोंडावर..

त्यांनी कायम भाजप व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भालावण आणि जोरकसपणे पाठराखण केली. तरीही ऐनवेळी उमेदवारी काटल्याचा आरोप त्यांनीच केला आहे. (Mla Vinayk Mete)
Mla Vinayak Mete
Mla Vinayak MeteSarkarnama

बीड : १९९५ सालापासून अपवाद वगळता विधान परिषदेचे सदस्य राहीलेल्या शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या आमदारकीला भाजपने ब्रेक दिला आहे. (Beed) या २७ वर्षांच्या काळात साधारण २५ वर्षे आमदार राहीलेले विनायक मेटे (Vinayak Mete) केवळ आताच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात सत्तेतील आमदार नव्हते. आता ते आमदारही नाहीत व सत्तेतही नाही आणि स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर आल्या आहेत. आता या निवडणुकीचा घाट मेटे कसा चढतात ते पहावे लागेल.

मराठा महासंघाच्या माध्यमातून मराठा आरक्षणासह इतर मुद्द्यांच्या माध्यमातून ते सामाजिक चळवळीत उतरले. १९९४ च्या निवडणुकीत मराठा महासंघाने तत्कालिन युतीला पाठींबा दिला होता. (Marathwada) सरकार आल्यानंतर विधान परिषदेवर विनायक मेटे यांची वर्णी लागली. त्यानंतर त्यांचे युतीशी बिनसले आणि त्यांचा महाराष्ट्र लोकविकास पार्टी हा पक्ष राष्ट्रवादीत विलिन करुन प्रवेश केला. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादीनेही दोन वेळा विधान परिषदेवर संधी दिली. या काळातही मेटे सत्तेतीलच आमदार होते.

नंतर त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान शिवसंग्राम पक्ष महायुतीत सामिल केला. यानंतरही भाजप सत्तेत आला. पक्षांतरामुळे त्यांची गेलेल्या आमदारकीची अर्धी टर्म त्यांना भाजपने दिली. त्यानंतर पुन्हा भाजपने त्यांना संधी दिली. दरम्यान, आताचा अडीच वर्षांचा काळ सोडता विनायक मेटे आमदारही होते आणि विशेष म्हणजे सत्तेतही असत. पुर्वी राष्ट्रवादीत असताना एखाद दुसऱ्या समर्थकाला जिल्हा परिषदेची उमेदवारी व एखाद दुसऱ्याला बीड नगर पालिकेची उमेदवारी घेत.

परंतु, ग्राऊंड लेव्हलला निवडणुकीच्या रिंगणात उतरायला त्यांनी व त्यांच्या पक्षाने २०१४ पासून सुरुवात केली. तेव्हा भाजप लाट असतानाही त्यांनाच बीडमधून पराभव पत्करावा लागला. तर, २०१७ च्या नगर पालिका निवडणुकीत बीडमध्ये त्यांच्या शिवसंग्राम उमेदवारांचा पुरता पाडाव झाला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मात्र त्यांच्या पक्षाने चांगली चमक दाखविली. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासह बीड पंचायत समितीमध्ये शिवसंग्रामला सत्ताही मिळाली. नंतर मात्र चारही जिल्हा परिषद सदस्य व तीन पंचायत समिती सदस्य त्यांना सोडून गेले.

Mla Vinayak Mete
Beed : ताकद दाखवली, तर पक्षाला पंकजा मुंडेंची दखल घ्यावीच लागेल..

आता नगर पालिका व जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुका तोंडावर असतानाच भाजपने त्यांच्या विधान परिषदेतील आमदारकीला ब्रेक लावला आहे. त्यांनी कायम भाजप व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भालावण आणि जोरकसपणे पाठराखण केली. तरीही ऐनवेळी उमेदवारी काटल्याचा आरोप त्यांनीच केला आहे. यावेळीही त्यांच्या उमेदवारीसाठी अनेक जमेच्या बाजू होत्या.

मात्र, त्यांचा व समर्थकांचा भाजपने हिरमोड केला. त्यामुळे त्यांना ‘स्थानिक’चा घाट चढताना मोठी कसरत करावी लागणार आहे. पुर्वी सत्ता आणि आमदारकीच्या ग्लॅमरमध्ये त्यांना सोपे होते. परंतु, आता नव्याने त्यांना किमान जिल्ह्यात तरी जोराची बांधणी करावी लागणार आहे. ती बांधणी करुन श्री. मेटे हा घाट कसा चढतात ते पहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com