भाजप आमदारांच्या काकांच्या शेतातून धान्य साठा जप्त ; राष्ट्रवादीची तक्रार

आमदार मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांच्या काकांच्या शेतातून विशेष पथकाने तब्बल 118 क्विंटल रेशनचे धान्य जप्त केल्याचा दावा राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे (vijay bhamble) यांनी केला.
Ration grains

Ration grains

sarkarnama

परभणी : भाजपच्या आमदाराच्या काकांच्या शेतातून बेकायदा ११८ क्विंटल रेशनचा धान्य जप्त केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे (vijay bhamble) यांनी केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी-भाजपच्या आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली आहे. या प्रकरणाची सखोल चैाकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

भाजप आमदार मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांच्या काकांच्या शेतातून पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने तब्बल 118 क्विंटल रेशनचे धान्य जप्त केल्याचा दावा राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे (vijay bhamble) यांनी केला. परभणीत पत्रकार परिषद भांबळेंनी आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी थेट गृहमंत्र्यांना प्रकरणाची माहिती दिल्याचा ही दावा केला.

जिंतूर तालुक्यातील मुंडा येथून 22 डिसेंम्बर रोजी पोलीस अधीक्षकांच्या पथकाने एका शेतात कारवाई करत रेशनचा धान्य जप्त केले होते. त्या शेताचे मालक आमदार मेघना बोर्डीकर यांचे काका आणि माजी आमदार , भाजप नेते रामप्रसाद बोर्डीकर यांचे सख्खे बंधू गंगाधर बोर्डीकर आरोपीला तत्काळ अटक करून प्रकरणाची सखोल चौकशी करावी तर गंगाधर बोर्डीकर हे गेल्या पंधरा वर्षापासून हा व्यवसाय करीत असल्याचा आरोप विजय भांबळे यांनी केला.

<div class="paragraphs"><p>Ration grains</p></div>
धक्कादायक : राज्यात पाच महिन्यात १०७६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

गंगाधर बोर्डीकर हे राजकीय व्यक्ती असून हे प्रकरण दाबण्यात येत असल्याचा आरोप भांबळे यांनी केला आहे. घटनास्थळावरुन ताब्यात घेतलेल्या व्यक्तींवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हे धान्य तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात यावे, यामागील रॅकेटचा तपास करावा, अशी मागणी भांबळे यांनी केला आहे. याबाबतचे निवदेन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

<div class="paragraphs"><p>Ration grains</p></div>
विधानसभा अध्यक्षांची निवड नियम डावलून करण्यातच सरकारला रस

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com