Beed : विधान परिषदचे रेकॉर्ड झाले, पण मेटेंचे मंत्रीपदाचे स्वप्न अधुरेच राहीले..

मागच्या महिन्यात मुंबईत त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालिन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विनायक मेटे यांच्या मंत्रीपदाबाबत स्पष्ट संकेत दिले. (Vinayak Mete)
Vinayak Mete News Beed
Vinayak Mete News BeedSarkarnama

बीड : कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना पाच वेळा विधान परिषद सदस्य राहण्याचे भाग्य विनायक मेटे यांच्या नशिबी आले. (Beed) मात्र, त्यांच्या राजकीय काळात मंत्रीपदाचे स्वप्न मात्र अपूरे राहीले. आता नव्या सरकारमध्ये मंत्रीपदाची आशा निर्माण झालेली असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

समाजकारणातून राजकारणात प्रवेश केलेल्या विनायक मेटे (Vinayak Mete) यांना सुरुवातीला पहिल्या युती सरकारच्या काळात राज्यपाल नामनियुक्त विधान परिषदेचे सदस्यत्व मिळाले. (Marathwada) नंतर त्यांनी आपला पक्ष राष्ट्रवादीत विलीन केल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना विधानसभा सदस्यांतून निवडायच्या विधान परिषद सदस्यपदी संधी दिली. राष्ट्रवादीने त्यांना अशी संधी दोनदा दिली.

दरम्यान, २०१४ साली त्यांनी भाजपसोबत युती केली. भाजप नेतृत्वाखालील महायुतीचे सरकारही सत्तेवर आले. त्यांना भाजपनेही दोन वेळा विधान परिषदेवर संधी दिली. त्यांच्या राजकीय आयुष्यात ते पाच वेळा आणि साधारण २२ वर्षे विधान परिषद सदस्य राहीले आहेत. महाराष्ट्राच्या विधान परिषद सभागृहाचा येवढा दिर्घ काळ सदस्य राहण्याचा विक्रम एकमेव विनायक मेटे यांच्या नावे आहे.

Vinayak Mete News Beed
नरेंद्र मोदींवर ध्वजसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा- नाना पटोलेंची मागणी

मात्र, त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही. तत्कालिन महायुती सरकारमध्ये मंत्रीपद न मिळालेले विनायक मेटे एकमेव घटक पक्षाचे नेते होते. शेवटपर्यंत त्यांच्या मंत्रीपदाची चर्चा होत राहीली मात्र संधी मिळाली नाही. दरम्यान, आता पुन्हा महायुती सरकार सत्तेत आले.

मागच्या महिन्यात मुंबईत त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालिन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विनायक मेटे यांच्या मंत्रीपदाबाबत स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे आगामी विस्तारात विनायक मेटे यांना स्थान मिळेल, अशी आशा वाटत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com