Vidhan Parishad News : संजय राऊतांच्या विधानाविरुद्ध हक्कभंगाचा निर्णय उद्या , आजचे कामकाज तहकूब..

Budget Session : एखाद्या सदस्याच्या अटकेचे निर्देश सभापतींनी द्यावे, या मताची मी नाही, तो माझा अधिकार देखील नाही.
Nilam Gorhe-Sanjay Raut News, Vidhan Parishad
Nilam Gorhe-Sanjay Raut News, Vidhan ParishadSarkarnama

Maharashtra : उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधीमंडळात सगळे चोर बसले आहेत, असे वादग्रस्त विधान केले. याचे पडसाद आज विधानपरिषदेत उमटले. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याची तसेच त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली.

Nilam Gorhe-Sanjay Raut News, Vidhan Parishad
Sandipan Bhumre News : विमानातील हायफाय जेवण नाकारत भुमरेंची चटणी-भाकरीलाच पसंती..

त्याला विरोधी पक्षाने आक्षेप घेत विरोधी पक्षाला महाराष्ट्रद्रोही, राष्ट्रद्रोही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या विधानाची देखील चौकशी करा, (Budget Session) आमचा देखील हक्कभंग स्वीकारा, अशी मागणी केली. दोन्ही बाजूने गोंधळ सुरू असतांना विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी संजय राऊत यांचे विधान तपासून पाहिल्यानंतर हक्कभंगावर निर्णय घेतला जाईल, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज सुरू ठेवण्याचे आवाहन दोन्ही बाजूच्या सदस्यांना केले.

मात्र त्यानंतरही संजय राऊत यांच्यावरील हक्काभगांची मागणी लावून धरत सत्ताधारी सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यावर नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. उद्या सकाळी ११ वाजता सभागृहाचे काम सुरू होईल, तेव्हा राऊतांच्याविरोधातील हक्कभंगाच्या प्रस्तावावर निर्णय घेतला जाईल, असेही गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

सभागृहात दोन्ही बाजूंनी गोंधळ सुरू असतांना गोऱ्हे यांनी सभागृहाला हक्कभंगाच्या अधिकाराबद्दल सांगितले. गोऱ्हे म्हणाल्या, सभापती म्हणून एखाद्या हक्कभंगावर निर्णय घेण्याचा अधिकार मला आहे. त्यानूसार संजय राऊत यांनी केलेले विधान तपासून घेवून पुढील कारवाई संदर्भात निर्णय घेतला जाईल. त्यांना अटक करण्याच्या मागणीवर मी काही बोलणार नाही.

एखाद्या सदस्याच्या अटकेचे निर्देश सभापतींनी द्यावे, या मताची मी नाही, तो माझा अधिकार देखील नाही. सरकार, गृहमंत्र्यांना तो अधिकार आहे. अटके संदर्भात त्यांनी काय तो निर्णय घ्यावा. त्यामुळे आता सभागृहाचे कामकाज पुढे सुरू राहिले पाहिजे ही एकनाथ खडसे यांनी मांडलेली भूमिका योग्य आहे.

Nilam Gorhe-Sanjay Raut News, Vidhan Parishad
Fadanvis : एकाने गाय मारली, म्हणून दुसऱ्याने वासरू मारावे, असं होत नाही, असं का म्हणाले फडणवीस?

राज्यपालांच्या अभिभाषणावर आपण बोलावे. विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री, एकनाथ खडसे इतर लोक हक्कभंगाच्या विषयावर बोलले आहेत. परंतु त्यानंतरही सरकारकडूनच राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन ठरावावर कोणी बोलायला तयार नाही. त्यामुळे मी सभागृहाचे आजचे कामकाज तहकूब करत असल्याचे गोऱ्हे यांनी जाहीर केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com