
Bazar Samiti Result : परभणी (Parbhani) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा डंका वाजला आहे. बाजार समितीच्य एकूण १८ जागांपैकी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पुरस्कृत पॅनलमधील उमेदवारांचा एकूण १२ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडीला (Mahaviksa Aghadi) पुरस्कृत पॅनलला १२ जागा मिळाल्या तर भाजपला पुरस्कृत पॅनेलला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. या ठिकाणी अपक्षांना दोन जागा मिळाल्या. यामुळे आता स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.28 एप्रिल) मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये परभणीचा यश महाविकास आघाडीसाठी आश्वासक मानण्यात येतो.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.