Vanchit Aghadi : खैरे दोन दिवसात माफी मागा, नाहीतर दिसाल तिथे काळं फासू..

चंद्रकांत खैरे यांनी वंचित आघाडी व एमआयएमवर लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रत्येकी १ हजार कोटी रुपये भाजपकडून घेतल्याचा आरोप केला होता. (Shivsena)
Vanchit Aghadi : खैरे दोन दिवसात माफी मागा, नाहीतर दिसाल तिथे काळं फासू..
Chandrakant Khaire-Vanchit Bahujan AghadiSarkarnama

औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी जालना येथील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) भाजपकडून लोकसभा निवडणुकीत १ हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. (Shivsena) त्यांच्याकडे तसे पुरावे असतील तर त्यांनी पोलिसांना द्यावेत, नाहीतर खोटे आरोप केल्याबद्दल दोन दिवसात माफी मागावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

दोन दिवसात माफी मागा, नाहीतर दिसाल तिथं काळ फासू, असा इशारा देखील आज झालेल्या पदाधिकाऱ्यांची बैठकीत देण्यात आला. (Chandrakant Khaire) खैरे यांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी तक्रार देखील वंचितच्या वतीने पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.

चंद्रकांत खैरे यांनी वंचित आघाडी व एमआयएमवर लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रत्येकी १ हजार कोटी रुपये भाजपकडून घेतल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर वंचित आघाडीचे नेते चांगलेच संतापले होते. प्रदेश प्रवक्ते फारूक अहमद यांनी तर खैरेंना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर आज जिल्ह्यातील वंचितच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली.

Chandrakant Khaire-Vanchit Bahujan Aghadi
Osmanabad : सलगर कुंटुंबाकडून सुप्रिया सुळे यांचे औक्षण अन् घोंगडी भेट देऊन स्वागत..

या बैठकीत आक्रमक झालेल्या पदाधिकाऱ्यांनी खैरेंना काळे फासण्याचा व त्यांच्या कार्यालयासमोर जाऊन निदर्शने करण्याचा इशारा दिला. खैरेंच्या आरोपांवर संतापलेल्या पदाधिकाऱ्यांनी सिटीचौक पोलिस ठाण्यात तक्रार देऊन खैरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली आहे. अन्यथा २ जून रोजी त्यांच्या मछली खडक येथील घरावर मोर्चा काढू, दोन दिवसात माफी मागितली नाही, तर जिथे सापडतील तिथे काळे फासणार असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in