Vaijapur APMC Election : भाजपमध्ये फूट पडूनही आमदार बोरनारेंनी बाजी मारली, दहा जांगा जिंकल्या..

Mla Bornare : बोरनारे यांना घेरण्यासाठी महाविकास आघाडी व ठाकरे गटाने जोरदार फिल्डिंग लावली होती.
Vaijapur Market Committee News
Vaijapur Market Committee NewsSarkarnama

Marathwada : वैजापूर बाजार समितीमध्ये (Vaijapur Market Committee) आमदार बोरनारे विरुद्ध इतर सगळे राजकीय पक्ष असे चित्र होते. भाजपचा एक गट पुर्णपणे महाविकास आघाडीसोबत होता, तरी देखील उर्वरित भाजपला सोबत घेत शिंदे गटाचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांनी १० जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

Vaijapur Market Committee News
Chhatrapati Sambhajinagar APMC : भाजपने अकरा जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीला रोखले..

महाविकास आघाडीच्या वाट्याला ५ जागा आल्या असून अद्याप तीन जागांचा निकाल जाहीर झालेला नाही. शिंदे गटाचे आमदार प्रा. रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांना घेरण्यासाठी महाविकास आघाडी व ठाकरे गटाने जोरदार फिल्डिंग लावली होती. माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्यासह महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपचे परदेशी वगळता इतर नेत्यांनी देखील बोरनारे यांच्याकडे पाठ फिरवली होती.

मात्र प्रत्यक्षात काल मतदान होवून आज निकाल जाहीर झाले तेव्हा बोरनारे व भाजप युतीच्या पॅनलने जाहीर झालेल्या पंधरा जागांपैकी १० जांगावर विजय मिळवला, तर महाविकास आघाडीने पाच जागा जिंकल्या आहेत. तीन जागांचा निकाल जाहीर होणे बाकी आहे. (Marathwada)

विजयी उमेदवारांमध्ये बोरनारे यांच्या पॅनलचे रामहरी बापू, काकासाहेब पाटील, कल्याण दागोडे, कल्याण जगताप, शिवकन्या पवार,नजन रजनीकांत, गणेश इंगळे, प्रवीण पवार, गोरख आहेर आणि प्रशांत त्रिभूवन यांचा समावेश आहे.

तर महाविकास आघाडीच्या पॅनलचे अविनाश गलांडे, संजय निकम, ज्ञानेश्वर जगताप, अनिता वाणी व प्रशांत सदाफळ हे विजयी झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने भाजपमध्ये फूट पाडून देखील आमदार बोरनारे यांच्या बळीराजा पॅनलची सरशी झाल्याचे पहायला मिळाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in