वड्डेटीवार म्हणतात, गडकरींनी फडणवीसांची जिरवली, त्यांच्यात छत्तीसचा आकडा

(Deglur-Biloli By Election) बॅकफूटवर गेलेल्या भाजपला फ्रंटफुटवर येऊच द्यायचे नाही, अशी रणनिती अशोक चव्हाण व काॅंग्रेसने आखल्याचे दिसते.
Waddettiwar-Gadkari-Fadanvis
Waddettiwar-Gadkari-FadanvisSarkarnama

नांदेड ः देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीच्या ऐन मतदानाच्या दहा दिवस आधी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी खतगांवकरांना काॅंग्रेसमध्ये आणत भाजपला जोरदार दणका दिला. या दणक्याने आत्मविश्वास बळावलेल्या काॅंग्रेसने आता भाजपवर चांगलाच हल्ला चढवला आहे. निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्यात असतांना काॅंग्रेस महाविकास आघाडीचे नेते सक्रीय झाले आहेत.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांची नुकतीच मतदारसंघात जाहीर सभा झाली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चांगलीच जिरवल्याची टीका वड्डेटीवार यांनी केली. नागपूरच्या या दोन्ही नेत्यांमध्ये छत्तीसचा आकडा आहे, हे सांगायला देखील ते विसरले नाहीत.

पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर विरुद्ध भाजपचे सुभाष साबणे यांच्यात थेट लढत आहे. या निवडणुकीत काॅंटे की टक्कर होणार असे वाटत असतांनाच अशोक चव्हाण यांचे भावजी माजी मंत्री भास्करराव पाटील खतगांवकर यांनी आपल्या समर्थकांसह काॅंग्रेसमध्ये जाण्याची घोषणा केली.

भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून आपण पक्ष सोडल्याचे त्यांनी सांगितले होते. खतगांवकर हे दोनवेळा खासदार, तीनवेळा आमदार आणि राज्यात मंत्री देखील राहिलेले आहे. बिलोली तालुक्यात व जिल्ह्यात देखील त्यांचे चांगले राजकीय वजन आहे. त्यामुळे काॅंग्रेसला सुरूवातीला अवघड वाटणारा देगलूर-बिलोलीचा पेपर आता सोपा झाला आहे.

निवडणूक अवघड असल्याची कबुली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील आपल्या नांदेड दौऱ्यात दिली होती. एकूणच बॅकफूटवर गेलेल्या भाजपला फ्रंटफुटवर येऊच द्यायचे नाही, अशी रणनिती अशोक चव्हाण व काॅंग्रेसने आखल्याचे दिसते. विजय वड्डेटीवार यांनी भाजपमधील बड्या नेत्यांमधील बिघडलेले संबंध, अंतर्गत वाद याविषयीच थेट भाष्य केले.

Waddettiwar-Gadkari-Fadanvis
काँग्रेसला धक्का; नगराध्यक्ष मोदी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

वड्डेटीवार म्हणाले, गडकरी आणि फडणवीस यांच्यात जमत नाही. दोघांमध्ये ३६ चा आकडा आहे. गडकरींनी फडणवीसांची चांगलीच जिरवल्याचे मला कानात सांगितले आहे. आता आणखी जिरवणार असल्याचा दावाही वड्डेटीवार यांनी केला. नागपूरवाल्यांना फडणवीस आणि गडकरी यांच्यातील संबंध चांगले माहित आहे. त्यामुळे आपला विजय या निवडणुकीत निश्चित असल्याचा दावा देखील वड्डेटीवार यांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com