मराठी पाट्यांसाठी खासदार निधी वापरा; शिवसेनेचा एमआयएमला सल्ला

दुकानदारांनी पुढाकार घेऊन मराठीतून पाट्या लावण्याची कार्यवाही करावी, नसता शिवसेना आक्रमक होऊन दुकानांवरील पाट्या मराठीतून लावण्याची मोहीम हाती घेईल. (Shivsena Aurangabad)
Mp Imtiaz Jaleel- Raju Vaidya
Mp Imtiaz Jaleel- Raju VaidyaSarkarnama

औरंगाबाद : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यात सर्वत्र मराठी भाषेतून पाट्या लावण्याचा निर्णय घेतला. (Shivsena) या निर्णयाचे श्रेय घेण्यावरून शिवसेना- मनसेमध्ये स्पर्धा लागलेली असतांनाच आता मराठी पाट्यांसाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. (Mp Imtiaz Jalil) दुकानदारांनी स्वतः मराठी पाट्या लावाव्यात नाहीतर शिवसेना (Marathwada) आक्रमकपणे रस्त्यावर उतरून त्या लावेल, असा इशारा शिवसेनेचे संघटक राजू वैद्य यांनी दिला.

या निर्णयानंतर मुख्यमंत्री व सरकारवर टीका करणाऱ्या एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना देखील त्यांनी टोला लगावला. खासदार निधी हा देखील शासकीयच असतो, मराठी पाट्यांसाठी खासदार निधी वापरा आम्ही तुमचे स्वागतच करू, असेही वैद्य यांनी सुनावले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने मराठी भाषेचे जतन करून तिच्या संवर्धनासाठी व मुलांवर बाल वयातच भाषेचा संस्कार व्हावा या उद्देशाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची तातडीने दुकानदारांनी स्वतः हून अमंलबजावणी करावी, नसता मराठीतून पाट्या लावण्यासाठी शिवसेना आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा वैद्य यांनी दिला.

राज्यात दुकानांना मराठी पाट्या लावण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. मराठी पाट्यांच्या माध्यमातून मुलांवर भाषेचा नकळत संस्कार होतो. स्थानिक भाषेच्या जतनासाठी तिचा वापर वाढवणे गरजेचे आहे. शिवसेनेने सुरूवातीपासून मराठी भाषेतून पाट्या लावण्याची मागणी केलेली आहे.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठी राजभाषा संवर्धन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दुकानांना मराठीतूनच पाट्या लावण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन मंत्रीमंडळाच्या बैठकीत मराठीतून पाट्या लावण्याचा निर्णय घेतला.

Mp Imtiaz Jaleel- Raju Vaidya
पोलिस निरीक्षकांच्या विरोधात शिवसेना आमदार बसणार उपोषणाला

या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आता दुकानदारांनी पुढाकार घ्यावा. मराठीतून पाट्या लावण्याची कार्यवाही करावी, नसता शिवसेना आक्रमक होऊन दुकानांवरील पाट्या मराठीतून लावण्याची मोहीम हाती घेईल, असेही वैद्य यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. मराठी पाट्याबद्दल प्रतिक्रिया देतांना खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली होती.

पाट्या बदलून मराठी तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत का? कोरोनामुळे लोकांना खायला नाही, ते पाट्या कशा बदलणार? शासन त्यासाठी निधी देणार का? असा सवालही त्यांनी केला होता. त्याला देखील वैद्य यांनी प्रत्युत्तर दिले. खासदार निधी देखील शासकीय निधी आहे. त्यामुळे मराठीतून पाट्या लावण्यासाठी खासदार निधी वापरल्यास त्यांचेही स्वागत करु असे म्हणत इम्तियाज जलील यांना टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com