Uorfi Javed-Chitra Wagh : चित्रा वाघ पत्रकारावर भडकून म्हणाल्या, "उद्या तू अंतर्वस्त्रावर..."

Uorfi Javed-Chitra Wagh : "लोकं दगडाने मारतील की तुला, आधी कपडे घालायला शिका"
Uorfi Javed-Chitra Wagh :
Uorfi Javed-Chitra Wagh :Sarkarnama

Uorfi Javed-Chitra Wagh : वेगवेगळ्या पेहरावावरून कायम चर्चेत येणारी उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातला वाद आता विकोपाला गेला आहे. सार्वजनिक ठिकाणी उर्फीने तोकड्या कपड्यावरून वावरणे, यावर वाघ यांनी आक्षेप घेतला आहे. 'उर्फीच्या तोबाडीत लगावेन' अशी धमकीही वाघ यांनी दिली होती. आता हे प्रकरण राज्य महिला आयोग व मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) दारात पोहचेले आहे. उर्फीने वाघ यांच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे. मात्र आता याप्रकरणी भाष्य करत असताना, चित्रा वाघ या पत्रकारावर भडकले आहेत.

Uorfi Javed-Chitra Wagh :
Operation Lotus : महाराष्ट्रानंतर भाजपचं आणखी एका राज्यात 'ऑपरेशन लोटस'? : भाजप खासदाराचा दावा!

चित्रा वाघ या पत्रकारांशी संवाद साधते होते, यावेळी बोलताना वाघ यांनी पत्रकारांशी एकेरी भाषेचा वापर करत, पत्रकारांवर भडकल्या आहेत. एका पत्रकाराने त्यांना प्रश्न केला की, 'राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तिला काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत, त्यात तुम्ही हस्तक्षेप करताय, असं वाटत नाही का तुम्हाला?"

Uorfi Javed-Chitra Wagh :
Jagtap-Barne News : लक्ष्मण जगतापांसोबतची १० वर्षांची राजकीय दुश्मनी अशी संपवली : खासदार बारणेंनी सांगितली आठवण

यावर उत्तर देताना वाघ भडकून म्हणाल्या की, "ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, संभाजीनगरच्या चौकात कोणी उघडी नाचलेली तुम्हाला चालेल का? कपडे घाला एवढेच म्हणतोय आम्ही,व्यक्तिस्वातंत्र्य आहे. तू काय घालायचं आणि काय नाय घालायचं याचं तुला स्वातंत्र्य आहे, पण उद्या तू आपलं अंतरवस्त्र घालून फिरशील तर लोकं दगडाने मारतील की तुला. हेच सांगते मी तुला, कपडे काय घालायचं आणि काय नाही घालायचं याच्याआधी कपडे घालायला शिका, हेच सांगतोय मी तुला," अशा शब्दांचा वापर करत चित्रा वाघ भडकल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com