Jalna : वाघ्या-मुरळीच्या गोंधळात रावसाहेब दानवेंनी वाजवले तुणतुणे..

वाघ्या-मुरळींचा गोंधळ रंगात आला होता, वाघ्या तुणतुण वाजवून गोंधळात रंगत आणत असतांना अचानक रावसाहेब दानवे यांनी त्याचे तुणतुणे हाती घेतले. (Raosaheb Danve)
Railway State Minister Raosaheb Danve, Raosaheb Danve Latest News in Marathi
Railway State Minister Raosaheb Danve, Raosaheb Danve Latest News in MarathiSarkarnama

भोकरदन : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नेहमी चर्चेत राहणारे व्यक्तीमत्व. आपल्या निरनिराळ्या कारनाम्यांनी ते नेहमीच लोकांचे लक्ष आपल्याकडे केंद्रित करून घेतात. (Jalna) बुलेट, घोडा सवारी, ट्रॅक्टर, बैलगाडी हाकणे, म्हशीचे दूध काढणे ते चुलीवर भाजी, भाकरी करतांनाची त्यांची अनेक रुप आतापर्यंत समोर आली आहेत. (Raosaheb Danve) आता एका जागरण-गोंधळ कार्यक्रमात चक्क हातात तुणतुणे घेऊन वाजवतांनाचा त्यांचा नवा अवतार समोर आला आहे. (Raosaheb Danve Latest News in Marathi)

सोशल मिडियावर तर याची चर्चा सुरूच आहे, पण तुणतुणे वाजवतांनाच्या दानवे यांच्या व्हिडिओ आणि फोटोमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खसखस पिकतांना दिसत आहे. (Marathwada) सर्वसामान्यामध्ये मिसळण्याचा स्वभाव आणि तीच आपल्या राजकारणात यशस्वी होण्याची गुरू किल्ली असल्याचे जाहीरपणे सांगणारे रावसाहेब दानवे आपल्या ग्रामीण शैलीमुळे राज्यभरात प्रसिद्ध आहे.

मतदारसंघात असतांना तर ते आपण मंत्री आहोत हे देखील विसरून जातात. मध्यंतरी आपल्या वर्ग मित्राला पुर्वोत्तर राज्यांच्या सफरीवर घेऊन गेलेल्या दानवेंनी अगदी मुख्यमंत्र्यांच्या भेटीत देखील आपल्या मित्राला सोबत ठेवल्याचे पाहून अनेकांनी त्यांच्या या मैत्रीचे गोडवे गायले. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सांभाळणारा असा हा नेता दोन दिवसांपुर्वी आपल्या मतदारसंघातील खामखेडा गावतल्या एका कार्यकर्त्यांच्या घरी आयोजित जागरण-गोळळ कार्यक्रमात सहभागी झाला.

Railway State Minister Raosaheb Danve, Raosaheb Danve Latest News in Marathi
Rajesh tope : शरद पवारांना जातीयवादी म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा..

वाघ्या-मुरळींचा गोंधळ रंगात आला होता, वाघ्या तुणतुण वाजवून गोंधळात रंगत आणत असतांना अचानक रावसाहेब दानवे यांनी त्याचे तुणतुणे हाती घेतले. बराचवेळ दानवे यांनी तुणतुणे वाजवत जागरण-गोंधळात साथसंगत केली. दानवे यांच्या या तुणतुणे वाजवण्याच्या प्रकारामुळे त्यांचे कार्यकर्ते आणि चाहते मात्र जाम खूष झालेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in