मोदी सरकारमुळे नव्हे तर अमेरिकेमुळे पेट्रोल महाग! रावसाहेब दानवेंचा दावा

देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक संकटात सापडले आहेत.
Raosaheb Danve
Raosaheb DanveSarkarnama

औरंगाबाद : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. यामुळे मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवरून मोदी सरकारला लक्ष्य केले जात असताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी (Raosaheb Danve) अमेरिकेकडे बोट दाखवले आहे.

येथे एका कार्यक्रमात बोलताना दानवेंनी पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीसाठी अमेरिकेला जबाबदार धरले. इंधन दरवाढीसाठी मोदी सरकारला लक्ष्य करणे चुकीचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्यात आले. पेट्रोलचे दर वाढवण्याचे काम केंद्र सरकार करीत नाही. अमेरिका हे दर ठरवत असल्याने यासाठी आम्हाला दोष देणे चुकीचे आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले असतानाही काँग्रेस आणि इतर पक्षांची सरकार असलेल्या राज्यांनी कर केले नाहीत. हे आपण जनतेच्या निदर्शनास आणून द्यायला हवे. सध्या केंद्र सरकारकडून मिळत असलेल्या पैशावर देश चालत आहे. राज्यात सत्तेत सहभागी असलेले तिन्ही पक्ष एकत्रितपणे बसून कोणताही निर्णय घेत नाहीत. आपण हे जनतेला सांगितल्यास आगामी महापालिका निवडणुकांत त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असेही दानवेंनी सांगितले.

Raosaheb Danve
देवेंद्र फडणवीस, फ्रान्सचा मॉरीस कोंबडा अन् गरूडावर बसलेला डोमकावळा

मोदी सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली आहे. यानंतर अनेक राज्यांनी करात कपात केली होती. इंधनावरील उत्पादन शुल्क कमी केल्याने केंद्र सरकारला चालू आर्थिक वर्षात 1.4 लाख कोटी रुपयांच्या उत्पादन शुल्कावर पाणी सोडावे लागेल. देशात 3 लोकसभा आणि 30 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या आहेत. यात काही ठिकाणी भाजपला फटका बसला. सर्वाधिक फटका हिमाचल प्रदेशमध्ये बसला होता. हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी जाहीरपणे याचे खापर महागाईवर फोडले होते. याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये भाजपचे चारही उमेदवार पराभूत झाले होते. कर्नाटक आणि हरियानातील प्रतिष्ठेच्या लढतीततही भाजपला हार पत्करावी लागली होती.

Raosaheb Danve
अमित शहांना आधी पंजाब अन् आता बंगालधून मोठा धक्का

पुढील वर्षी 7 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये हिमाचल प्रदेश तर डिसेंबरमध्ये गुजरातमध्ये निवडणूक होत आहे. यातील पंजाब वगळता इतर 6 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा फटका भाजपला बसणार हे पोटनिवडणुकांतून समोर आले आहे. यामुळे केंद्र सरकारनंतर भाजपशासित राज्यांनीही पेट्रोल, डिझेलवरील करात कपात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com