
लातूर : उदगीरच्या मराठी साहित्य संमेलनाच्या रविवारी (ता. २४) होणाऱ्या समारोपाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार नाहीत. (Latur) दिल्लीतील व्यग्र कार्यक्रम, अपरिहार्य कारणांमुळे त्यांचा दौरा रद्द झाला आहे. (95th All India Literary Convention) राष्ट्रपती भवनकडून तसे पत्र आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळाले.
राष्ट्रपती कोविंद हे संमेलनासाठी व्हिडिओ संदेश पाठवणार आहेत. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी याला दुजोरा दिला. (Marathwada) राष्ट्रपती कोविंद यांची उपस्थिती हे संमेलनाचे आकर्षण होते, त्यांच्या दौऱ्यामुळे संमेलनाची उंचीही वाढणार होती.
त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे दौऱ्याचे नियोजन केले जात होते. मात्र, दौऱ्याच्या अनुषंगाने केंद्रीय सुरक्षा यंत्रणेकडून सुरक्षेच्या हालचाली अद्याप सुरू झाल्या नव्हत्या. त्यामुळे दौरा रद्द होणार असल्याची चर्चा होती. तरीही ऐनवेळी बिदरमार्गे राष्ट्रपती येतील, अशी आशा साहित्य प्रेमी बाळगून होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २२ ते २४ एप्रिल या कालावधीत महाविद्यालयाच्या सुमारे ३६ एकरच्या परिसरात संमेलन साजरे होणार आहे. साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथिदडीने होणार असून यंदाच्या ग्रंथिदडीची तीन खास वैशिष्टय़े आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.