Ranajagjitsinha Patil On Thackeray: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना साध्या बैठकाही घेत नव्हते; राणाजगजितसिंह पाटलांचा आरोप

Political News: भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
Ranajagjitsinha Patil and 
Uddhav Thackeray
Ranajagjitsinha Patil and Uddhav ThackeraySarkarnama

Dharashiv News: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारमध्ये विनंती करून देखील सचिव, कृषिमंत्री हे धाराशिवमधील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात साधी बैठकही लावत नव्हते. पण आता गेल्या महिन्याभरात अनेक बैठका झाल्या आहेत, असा आरोप भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ठाकरेंवर केला.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकत्याच वेगवेगळ्या प्रश्नांवर बैठका घेतल्या. आता बैठका वेळेत होत असून काही अडचण नाही. आताच्या सरकारच्या काळात विरोधकांनी देखील बैठकीची मागणी केली तर अधिकारी किंवा मंत्री लगेच बैठका घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णय होतात, असेही आमदार पाटील म्हणाले.

Ranajagjitsinha Patil and 
Uddhav Thackeray
Shirdi Politics : शिर्डीवरून 'मातोश्री'वर खडाजंगी; बबनराव घोलप की भाऊसाहेब वाकचौरे ? ठाकरेंसमोर मोठा पेच

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जनतेच्या समस्या सोडविण्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी जनता दरबार आयोजित केला होता. यामध्ये महावितरणशी संबंधीत अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यात महावितरणचे तब्बल 36 अभियंत्यांची पदे रिक्त असून ते लवकर भरली जावीत, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

काँग्रेस धाराशिव लोकसभेची जागा ताकदीने लढवणार असल्याचे काँग्रेसचे नेते, आमदार अमित देशमुख यांनी सांगितले होते. याच संदर्भाने भाजपची काय तयारी आहे, असा प्रश्न आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना विचारण्यात आला, यावर बोलताना त्यांनी सांगितले की, "मला दिल्लीला पाठविण्याची घाई करू नका. त्यासाठी अद्याप खूप वेळ आहे. मी केवळ पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडत आहे, असे उत्तर देत त्यांनी मुख्य प्रश्नाला बगल दिली.

Ranajagjitsinha Patil and 
Uddhav Thackeray
Ajit Pawar On Bhujbal Speech : बीडच्या सभेत स्टेजवर बसलेले अजित पवार म्हणतात, '' भुजबळांचं भाषण मला ऐकूच आलं नाही..''

धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.तनाजी सावंत यांनी तुळजापूरच्या विकास आराखड्याबाबत बैठक घेऊन काही सूचना केल्या होत्या. याबाबत आमदार पाटील यांनी सर्वांनाच सूचना करण्याचा अधिकार आसल्याचे सांगितले.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in