Beed : पहिल्या युती सरकारमध्येच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं..

१९९५ मध्ये पहिल्यांदा राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले होते. तेव्हा पहिली चार वर्ष मनोहर जोशी, तर नंतर नारायण राणे हे मुख्यमंत्री झाले होते. (Beed News)
Ex.Minister Navle-Uddhav Thackeray News, Beed
Ex.Minister Navle-Uddhav Thackeray News, BeedSarkarnama

बीड : शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे यांना १९९६ मध्येच मुख्यमंत्री व्हायचे होते. (Beed) त्यासाठी त्यांनी आमदारांना तशी मागणी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे करायला सांगितली होती, असा गौप्यस्फोट माजी मंत्री शिंदेसेनेचे सुरेश नवले यांनी बीडमध्ये केला.

त्यामुळे ठाकरे (Uddhav Thackeary) यांनी इच्छा नसतांना महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपद स्वीकारले होते या चर्चेला काही अर्थ नाही, (Shivsena) त्यांना मुख्यमंत्री व्हायचेच होते, त्यासाठीच ते काॅंग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले, असा आरोप देखील त्यांनी केली.

मुंबईतील दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि शिंदेसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. रोज एकमेकांवर आरोप, दावे-प्रतिदावे सुरू आहेत. माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात गौप्यस्फोट केला होता.

एकनाथ शिंदे १५ आमदार घेऊन सत्ता स्थापनेसाठी काॅंग्रेसकडे आले होते, या त्यांच्या दाव्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. यावर भाजपने हा मुख्यमंत्री शिंदे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता पहिल्या युती सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या सुरेश नवले यांनी उद्धव ठाकरे यांना तेव्हा मुख्यमंत्री व्हायचे होते असा दावा, पत्रकार परिषदेत केला.

Ex.Minister Navle-Uddhav Thackeray News, Beed
Shivsena : भुमरेंचा जाळीची टोपी घातलेला फोटो अन् दानवे म्हणाले, व्वा रे हिंदू गर्व गर्जना यात्रा..

नवले म्हणाले, १९९६ मध्ये उद्धव ठाकरे यांनी आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन मला मुख्यमंत्री करण्याची शिफारस करण्यास सांगितले होते. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली उद्धवजी यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद द्यावे असा आग्रह देखील केला होता, असा आरोप नवले यांनी केला आहे.

१९९५ मध्ये पहिल्यांदा राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले होते. तेव्हा पहिली चार वर्ष मनोहर जोशी, तर नंतर नारायण राणे हे मुख्यमंत्री झाले होते. नवले हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. राणे यांच्यामुळेच तेव्हा नवले यांना मंत्रीपद मिळाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com