Nanvneet Rana : उद्धव ठाकरेंनी सभेत भाषण ठोकण्यापेक्षा औरंगाबादकरांना पाणी द्यावे..

राज्यात अनेक प्रश्न आहेत परंतु त्याकडे लक्ष द्यायला उद्धव ठाकरेंना वेळ नाही. ते तर राज्यसभा निवडणुक आणि त्यासाठीचे मतदार असलेल्या आमदारांना सांभाळण्यात व्यस्त आहेत. (Cm Uddhav Thackeray)
Mp Navneet Rana-Cm Uddhav Thackeray
Mp Navneet Rana-Cm Uddhav ThackeraySarkarnama

औरंगाबाद : अमरावतीतील पाणी प्रश्नावर बोलतांना खासदार नवनीत राणा यांनी औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांची आज सांयकाळी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा होत आहे. मुख्यमंत्र्यांनी सभेत जाऊन भाषण ठोकण्यापेक्षा औरंगाबादकरांना (Aurangabad) पाणी द्यावे, असा टोला नवनीत राणा यांनी लगावला. अमरावती येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना त्या बोलत होत्या.

राज्यात अनेक प्रश्न आहेत परंतु त्याकडे लक्ष द्यायला उद्धव ठाकरेंना वेळ नाही. ते तर राज्यसभा निवडणुक आणि त्यासाठीचे मतदार असलेल्या आमदारांना सांभाळण्यात व्यस्त आहेत. (Navneet Rana) मोठ्या हाॅटेलमध्ये सर्व आमदरांना ठेवून प्रत्येक आमदारांसाठी ५० हजार रुपये रोज खर्चले जात आहेत. परंतु माझ्या शहरातील पाणीप्रश्न सोडवायला त्यांना वेळ नाही.

आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी देखील याचा पाठपुरावा घ्यायाला पाहिजे, पण तसेही होतांना दिसत नाही. राज्य सरकार जर पाणी देवू शकत नसेल तर महानगरपालिकेने राज्याकडे आणि राज्याने केंद्राकडे अमृत योजनेसाठी प्रस्ताव पाठवावा, खासदार म्हणून मी तिथे पाठपुरावा करने.

Mp Navneet Rana-Cm Uddhav Thackeray
मराठा आरक्षणावर निर्णय झाला तर मुस्लिमांनाही आरक्षण द्यावे लागले ; आम्ही गप्प बसणार नाही

परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यासाठी वेळ नाही, त्यांना तर औरंगाबादला सभा घ्यायची आहे. पण माझे त्यांना सांगणे आहे, की औरंगाबादमध्ये जाऊन फक्त भाषण देऊ नका, तर तेथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवा, असे आवाहन देखील नवनीत राणा यांनी यावेळी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com