Uddhav Thackeray Visit Aurangabad-Marathwada News
Uddhav Thackeray Visit Aurangabad-Marathwada NewsSarkarnama

Marathwada : सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मुंबई बाहेर, उद्या औरंगाबादेत

मराठवाड्यात गेल्या १५ दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. (Marathwada News)

औरंगाबाद : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यातील सत्तातरानंतर पहिल्यादांच मुंबई बाहेर जाणार आहेत. राज्याच्या विविध भागांमध्ये परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास गेल्यामुळे त्यांची दिवाळी कडू झाली आहे. तर दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकार आणि कृषीमंत्री राज्यात ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती नसल्याचे सांगत आहेत.

Uddhav Thackeray Visit Aurangabad-Marathwada News
Marathwada : हे कसले मोठे नेते, एकाने गद्दारी केली, दुसऱ्याकडे एकही आमदार नाही.. तर तिसरा..

ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी उद्धवसेनेसह विरोधकांनी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे उद्या (Aurangabad)औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान ते जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व त्यांच्या शेताची पाहणी करणार आहेत. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे उद्या, रविवार २३ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद दौऱ्यावर परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पहाणी करणार आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेऊन त्यांना शासकीय मदत तातडीने मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या हेतूने हा दौरा तातडीने आयोजित करण्यात आल्याचे बोललो जाते.

मराठवाड्यात गेल्या १५ दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसामुळे पूर्ण भिजून वाहून गेले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे . त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे.

Uddhav Thackeray Visit Aurangabad-Marathwada News
Shivsena : अखेर दानवेंचा भार ठाकरेंनी कमी केलाच, तनवाणींची जिल्हाप्रमुख पदी निवड

तरीही राज्यकर्ते राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता नाही, अशी जाहीर विधाने करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेऊन त्यांना तातडीने मदत कशी करता येईल याची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा हा दौरा असणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना शासकीय मदत लगेच कशी मिळवून देता येईल यासाठी ते शिवसेनेची यंत्रणा कार्यान्वीत करणार असल्याचे सांगितले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com