Ambadas Danve News : मराठवाड्यात गद्दार गाडले जातील ; अंबादास दानवेंचा इशारा

Maharashtra Politics : अंबादास दानवे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
Ambadas Danve News
Ambadas Danve NewsSarkarnama

Hingoli : "मराठवाडा ही संताची भूमी आहे, या मराठवाड्याने गद्दारांना कधीही साथ दिली नाही, हा इतिहास आहे. मराठवाड्यात गद्दार गाडले जातील," असा इशारा शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला.

"कृषीमंत्र्यांनी मराठवाड्यात आठ दिवसात बैठक घेऊ सांगितले होते, अद्याप त्यांनी बैठक घेतली आहे, अशी टीका दानवे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकास करीत नाही, पण विरोध करतात. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना पुरेशी कर्जमाफी केली नाही, पण उद्धव ठाकरे यांनी ९९ टक्के कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी केली," असे दानवे म्हणाले.

Ambadas Danve News
Swarajya First Anniversary : राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काहीही बोलत नाहीत ; संभाजीराजे सत्ताधाऱ्यांवर संतापले

उद्धव ठाकरे यांची रविवारी हिंगोली येथील रामलीला मैदानावर सभा झाली. यावेळी दानवे बोलत होते. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या महत्वाच्या नेत्यांच्या जिल्ह्यात सभा घेण्याचा निर्णय घेतला होता. राजकीय उलथापालथ पाहता या सभांना ब्रेक लागल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, आता पुन्हा उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहे. शिंदे गटाचे नेते संतोष बांगर यांच्या जिल्ह्यात ही सभा झाली.

Ambadas Danve News
Narendra Modi News : महागाईच्या मुद्यांवरून विरोधकांना उत्तर देण्यासाठी भाजपची रणनीती ; येत्या काही दिवसात आरोपांना ..

उद्धव ठाकरे म्हणाले, "राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकार मात्र फिरत आहेत. शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याचे पैसे त्यांना मिळाले नाहीत. कांद्याला योग्य भाव सरकारने दिला पाहिजे. एक लाख शेतकरी निराश असल्याची माहिती पुढे येत आहे,"

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in