Udaysingh Rajput : मरण पत्करेन, पण शिवसेनेशी गद्दारी करणार नाही..

राजपूत हे सायंकाळी औरंगाबादेत दाखल झाले. विमानतळावर समर्थकांनी त्यांचे स्वागतही केले. सत्ता, पैसा या अमिशाला बळी न पडता आपण पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. (Shivsena)
Cm Uddhav Thackeray- Mla Udaysingh Rajput
Cm Uddhav Thackeray- Mla Udaysingh RajputSarkarnama

औरंगाबाद : मी गेल्या २५ वर्षापासून राजकारणात आहे, वेगवेगळ्या पक्षाकडून, अपक्ष विधानसभा निवडणूक लढलो. पण नशिबाने नेहमीच हुलकावणी दिली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी माझ्यावर विश्वास टाकला, मला उमेदवारी दिली आणि मी निवडून आलो. २५ वर्षाच्या राजकीय प्रवासात शिवसेनेने (Shivsena) मला विधानसभेत जाण्याची संधी दिली. कन्नड-सोयगांव मतदारसंघातील जनतेने स्थानिक नेत्यांनी माझ्यावर प्रेम, विश्वास दाखवला, त्याला कदापी तडा जाऊ देणार नाही. एकवेळ मरण पत्करेन, पण शिवसेनेशी कधीही गद्दारी करणार नाही, असा शब्दात आपल्या भावना आमदार उदयसिंह राजपूत (Udaysingh Rajput) यांनी व्यक्त केल्या.

विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आणि काही मंत्री आमदार घेऊन गुजरातच्या सुरतमध्ये निघून गेले. (Aurangabad) त्यांच्या बंडाला समर्थन वाढत गेले, रोज कोणीतरी मंत्री, आमदार गुवाहाटीत दाखल होत असल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेवटच्या घटीका मोजत असल्याची चर्चा आहे. शिवसेनेला खिंडार पडल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला काल सोडला.

एकाही आमदाराने सांगितले तर मी क्षणभर मुख्यमंत्रीपदावर राहणार नाही, राजीनामा देऊन निघून जाईन, असेही स्पष्ट केले. पण त्यांच्या या आवाहनाचा देखील परिणाम बंडखोरावर होतांना दिसत नाहीये. शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील सात पैकी पाच आमदारांनी बंडाला साथ दिली. केवळ अंबादास दानवे, उदयसिंह राजपूत हे दोन आमदार शिवसेनेशी इमान राखून राहिले. उदयसिंह राजपूत हे तर तीन दिवस मुंबईतच होते.

सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्या बंडात ते देखील सामील असल्याच्या बातम्या पसरल्या. पण राजपूत यांनी मतदारसंघातील पदाधिकारी व प्रसार माध्यमांना देखील आपण शिवसेनेतच आहोत, मुंबईत उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे सांगितले. आज तीन दिवसानंतर राजपूत हे सायंकाळी औरंगाबादेत दाखल झाले. विमानतळावर समर्थकांनी त्यांचे स्वागतही केले. सत्ता, पैसा या अमिशाला बळी न पडता आपण पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

Cm Uddhav Thackeray- Mla Udaysingh Rajput
Aurangabad : शिवसेनेचा `पिया`, शिंदेचा प्यारा कसा ठरला ? जैस्वालांचे दुसऱ्यांदा बंड..

मला शंभर कोटी रुपये दिले असते तरी मी शिवसेनेशी कधी गद्दारी केली नसती. माझ्या पायात चप्पल नसली तर मी मरण पत्करेन, पण शिवसेनेशी कधी गद्दारी करणार नाही, याचा पुनरुच्चार देखील राजपूत यांनी यावेळी केला. उदयसिंह राजपूत यांचा एकनाथ शिंदे यांच्याशी मतदारसंघातील कामाच्या निमित्ताने आणि शिवसेनेती ज्येष्ठ मंत्री म्हणून अनेकदा संपर्क आला.

मतदारसंघातील विकासकामासांठी निधी मिळावा यासाठी राजपूत यांनी त्यांची अनेकदा भेट देखील घेतली. कदाचित त्यामुळेच सुरुवातीला राजपूत यांचे नाव समोर आले होते. परंतु या सगळ्या शंका आणि कुशंकावर राजपूत यांनी स्वतः पडदा टाकला. काल मुख्यमंत्री रात्री वर्षा या शासकीय निवासस्थानातून मातोश्रीकडे पायी निघाले तेव्हा, राजपूत हे वर्षा बंगल्यावरच होते. त्यानंतर आज ते औरंगाबादेत परतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com