Uday Samant on Sanjay Raut: संजय राऊत पुढील २५ वर्ष अशाच प्रेस कॉन्फरन्स घेत राहोत..

Aurangabad : मराठवाड्यातील उद्योगांनी आता या भागापुरतेच मर्यादित न राहता व्यापक विचार केला पाहिजे.
Uday Samant-Sanjay Raut News, Aurangabad
Uday Samant-Sanjay Raut News, AurangabadSarkarnama

Aurangabad News : संजय राऊत हे रोज उठून आमच्यावर टीका करत असतात, आज महाराष्ट्र एक्स्पो सारख्या चांगल्या कार्यक्रमाप्रसंगी मी त्याविषयावर बोलू इच्छित नाही. (Aurangabad) यापुढील २५ वर्ष त्यांनी अशाच प्रेस कॉन्फरन्स घेत राहाव्यात, याच माझ्या त्यांना सदिच्छा, अशा शब्दात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संजय राऊत यांना टोला लगावला.

Uday Samant-Sanjay Raut News, Aurangabad
Aimim : इम्तियाज यांची महाविकास आघाडीनंतर आता पंकजा मुंडेंना ऑफर...

औरंगाबादेतील आॅरिक सिटी येथे ५ ते ८ जानेवारी दरम्यान भरवण्यात आलेल्या महाराष्ट्र एक्स्पोच्या उद्धाटन कार्यक्रमासाठी उदय सामंत (Uday Samant) आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना सावंत यांनी (Sanjay Raut) संजय राऊतांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यावरून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

सामंत म्हणाले, संजय राऊत हे रोज सकाळी उठून आमच्यावर टीका करत असतात. त्यामुळे त्यावर बोलावचे असे काही नाही. ज्यांच्या बोलण्यातून रोज महिलांचा अपमान होते, आमचे मुडदे पाडण्याची भाषा ते करतात त्यांच्याकडून काय अपेक्षा करावी. त्यामुळे त्यांनी बोलत राहावं, इथून पुढची २५ वर्ष त्यांनी अशाच प्रेस कॉन्फरन्स करत राहाव्यात, याच माझ्या त्यांना सदिच्छा आहे.

राज्यात छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख धर्मवीर की स्वराज्यरक्षक यावरून वाद सुरू आहे. शिंदे गटाची भूमिका काय? यावर संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक यावर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करत दोन्ही उपाध्या वापरल्यास चुकीचे ठरणार नाही असे म्हटले आहे. तर दुसरीकडे अजित पवार आपल्या विधानावर ठाम आहेत. त्यामुळे त्यांच्याच पक्षात दोन परस्पर विरोधी मतप्रवाह असल्याचे दिसून आले आहे.

राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील उद्योगांच्या फायली रखडल्याची टीका केली जाते, पण त्यात तथ्य नाही. पालकमंत्री भुमरे, सहकारमंत्री सावे, केद्रीय मंत्री डाॅ. कराड आम्ही सर्वांनी एकत्रितपणे गेल्या महिन्यात अनेक प्रश्न मार्गी लावल्याचेही सामंत यांनी सांगितले. मराठवाड्यातील उद्योगांनी आता या भागापुरतेच मर्यादित न राहता व्यापक विचार केला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com