Uday Samant On Barsu News : केवळ राज्यात शिंदे-फडणवीस सरकार म्हणून बारसूला विरोध

Shivsena : महाराष्ट्रातील दीड ते दोन लाख लोकांना रोजगार मिळणाऱ्या प्रकल्पाला ठाकरे विरोध करत आहेत.
Uddhav Thackeray & Uday Samant News
Uddhav Thackeray & Uday Samant NewsSarkarnama

Chhatarapati Sambhajinagar : प्रकल्प मागायचा पण आपण आणि आपण तिथे मुख्यमंत्री नाही म्हणून विरोध करायचा, हे इतके वाईट राजकारण महाराष्ट्रात सुरु आहे, अशा शब्दात उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. बारसू रिफायनरी सर्वेक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते. केवळ राज्यात शिंदे-फडणवीस सरकार म्हणून ठाकरे बारसूला विरोध करत आहेत, असेही सामंत म्हणाले.

Uddhav Thackeray & Uday Samant News
Abdul Sattar News : सत्तार मतदारसंघात भाजपला विचारेना, नड्डा, बावनकुळेंकडे तक्रार करणार..

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील रस्ते कामाच्या भूमिपुजन मंगळवारी (ता. २५) उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते झाले. त्यानंतर मसिआच्या सभागृहात उद्योजकांशी झालेल्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. (Udya Samant) सामंत म्हणाले, बारसूमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरु झाले आहे. ज्यांनी प्रकल्पाची जागा सुचवली तेच तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता प्रकल्प नको म्हणून सांगत आहेत. त्यांनी त्यावेळी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात प्रकल्पाचे कौतूक केले होते.

केवळ आज शिंदे-फडणवीस सरकार आहे म्हणून, महाराष्ट्रातील दीड ते दोन लाख लोकांना रोजगार मिळणाऱ्या प्रकल्पाला ठाकरे विरोध करत आहेत. महाराष्ट्राच्या जीडीपीमध्ये ८.५ ने वाढ होईल, असेही त्यांनी पत्रात म्हटले होते, याचा संदर्भ सामंत यांनी दिला. (Maharashtra) समृद्धी महामार्गाला विरोध करा म्हणून त्यांनीच आमदारांना आदेश दिले होते. सगळ्या प्रकल्पांना विरोध करायचा ही प्रवृत्ती उद्योजकांनी एकत्र येत मोडीत काढली पाहिजे.कोकणाबाबत जी नकारात्मकता आली, ती उद्योजकांनी दूर केली पाहिजे. फक्त कोकणाला नाही तर, महाराष्ट्राला फायदा होणार आहे. असा दावा देखील सामंत यांनी केला.

मागच्यावेळी इथे आल्यानंतर तुम्ही मागण्या करत असताना मी झोपलो नव्हतो, म्हणून आपण ४० कोटीची मागणी केली असताना मी ७० कोटी रुपये दिले, असे म्हणत सामंत यांनी माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना टोला लगावला. तसेच इथले रस्ते होत असतानाच लक्ष ठेवा, त्याचवेळी मला सांगा, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेला रस्ता २५ वर्ष टिकला पाहिजे, असा दमच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भरला. उदय सामंत यांनी शब्द पाळल्याचे अतुल सावे यांनी सांगितले. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत ३७ वर्षांपासून जे रस्ते झाले नाहीत त्याचे काम सुरु होत असल्याचा आनंद आहे.

मात्र, याठिकाणी मुरुम चोरी मोठ्या प्रमाणात होते, त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी उद्योजकांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचे धाडस केले. त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. विजेचा दर वाढले आहेत, बाजूच्या राज्यांपेक्षा अडीच रुपये जास्त आहे, याकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी मसिआचे अध्यक्ष किरण जगताप यांनी केली. महापालिकेला कर मिळतो पण, उद्योजकांना सुविधा मिळत नव्हत्या. आधीचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना मिटींग लावायलाही वेळ नव्हता. साडेसात वर्षात ते कधी आले, कधी गेले हे कळालेच नाही. पालकमंत्री म्हणूनही अडीच वर्षात जिल्ह्याने त्यांना पाहिले नाही. भेटले तर कामे होतात, असा टोला पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी देसाईंना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com