शिवसेनेचे आणखी दोन आमदार फुटणार? शिंदे गटाच्या आमदाराचा दावा

Eknath Shinde Group| Uddhav Thackeray| एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेला चांगलीच गळती लागली आहे.
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama

औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेला चांगलीच गळती लागली आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यभरात अनेक ठिकाणी शिवसेनेतील (Shivsena) नगरसेवक, पदाधिकारीही शिंदे गटात सामील झाले. शिवसेनेची अशी सातत्याने पडझड सुरु असतानाच आता आखणी एक धक्का शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी लवकरच शिवसेनेतील आणखी दोन आमदार फुटणार असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. पैठण येथील कार्यक्रमात बोलताना संदीपान भुमरे यांनी हा दावा केला. त्यामुळे अगदी शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले कोणते दोन आमदार फुटणार याची चर्चा त्यांची साथ सोडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
पिंपरी पोलिसांचा धाक संपला का? सराईत गुंडाची सुटकेनंतर विजयी मिरवणूक

युवा सेनाप्रमुख आदित्य यांच्यावर निशाणा साधत संदीपान भुमरे यांनी शिवसेनेचे दोन आमदार फुटणार असल्याचे म्हटले. शिवसेनेत सध्या मुक्कामी असलेले दोन आमदार लवकरच फुटून शिंदे गटात सामील होतील. त्यातला एकाने आमची भेट घेतली असून दूसराही आमच्या संपर्कात असल्याचा दावा यावेळी भुमरे यांनी केला.

पैठण मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला लोकांची प्रचंड प्रतिसाद दिला. हाच धागा पकडत संदीपान भुमरे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. पैठणच्या बिडकीन गावात आदित्य ठाकरेंनी घेतलेल्या सभेपेक्षा गारुड्याच्या खेळाला जास्त गर्दी होते, अशी खोचक टिका भुमरेंनी केली. त्यामुळे आता शिवसेना यावर काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
पोलिसांचा धाक होतोय कमी...पिंपरी-चिंचवडमध्ये 3 दिवसांत 3 पोलिसांवर हल्ले

संदीपान भुमरेंची स्वत:च्याच मतदारसंघात शोभा

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भुमरे पहिल्यांदाच शनिवारी पैठण शहरात आले होते. पण त्यांच्याच मतदारसंघातच त्यांना थंड प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले. (Shivsena) एकनाथ शिंदेंचे बंड, सुरत, गुवाहाटी, गोवा, मुंबई ट्रीप, सत्ता स्थापन आणि मंत्रीमंडळ विस्तारा पुन्हा कॅबिनेट मंत्री झालेले (Paithan) पैठणचे आमदार संदीपान भुमरे बऱ्याच दिवसांनी आपल्या मतदारसंघात गेले होते. तिथे त्यांच्या स्वागतासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पण या कार्यक्रमा शे-दीडशे लोकही जमले नाहीत.

तर,कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्या दर्शवत शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक ट्विट करत भुमरे यांना चिमटा काढला आहे. `सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मुंबई अशी 'देश भ्रमंती' करून राज्याचे रोजगार मंत्री संदीपान भुमरे आज पहिल्यांदाच आपल्या पैठण मतदारसंघात प्रगटले. त्यांच्या स्वागताला पैठण मधील काही नागरिकांसह खूप रिकाम्या खुर्च्यांची देखील उपस्थिती होती`, असा टोला दानवे यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in