Tukaram Munde : काम नीट करा, नाहीतर नोकरी सोडा..

मुंडे यांनी फिव्हर क्लिनीक, ईएनसी रुम, डिलीव्हरी वार्ड आदींसह विविध भागांत पाहणी केली. यावेळी रेकॉर्ड व्यवस्थीत न ठेवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी चांगलेच सुनावले. (Beed News)
Officer Tukaram Munde Visit Beed News
Officer Tukaram Munde Visit Beed NewsSarkarnama

बीड : नॉर्मल डिलीव्हरीही रेफर केल्या जातात, अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, हा बेशिस्तपणा व कामचुकारपणा अजिबात जमणार नाही. काम नीट करा, अथवा नोकऱ्या सोडा, असा दम आरोग्य विभागाचे अभियान आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना भरला. मुंडे बुधवारी (ता. २६) जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी सुरुवातीला जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. यानंतर यंत्रणेच्या कामाचा आढावा घेतला.

Officer Tukaram Munde Visit Beed News
Marathwada : चहाला नकार देणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यास कृषीमंत्री म्हणाले, तुम दारू पिते क्या ?

मुंडे यांनी फिव्हर क्लिनीक, ईएनसी रुम, डिलीव्हरी वार्ड आदींसह विविध भागांत पाहणी केली. (Beed) यावेळी रेकॉर्ड व्यवस्थीत न ठेवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी चांगलेच सुनावले. (Marathwada) बाहेरुन औषधी लिहून देणे, बाहेरुन रोग निदान करायला लावल्याबद्दलही त्यांनी सुनावले. यानंतर तुकाराम मुंडे Tukram Munde यांनी आरोग्य यंत्रणेच्या कामाचा आढावा घेतला.

काही ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांतून रुग्णांचे रेफर, नॉर्मल डिलीव्हरी रेफरच्या प्रकाराबद्दल त्यांनी चांगलेच खडसावले. अशा अधिकाऱ्यांच्या अतिरिक्त वेतनवाढी, घरभाडे भत्ता बंद करा, त्यांचे क्वार्टर काढून घेण्याच्या सुचनाही त्यांनी जिल्हा शल्यचिकीत्सकांना दिल्या.

सरकार तुम्हाला पगार देतय, काम व्यवस्थीत करा, आता कामात कुचराई जमणार नाही, असे तुकाराम मुंढेंनी सुनावले. यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गित्ते आदींसह वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in