शेतकऱ्यांवर तिहेरी संकट ; मुंडेंनी आघाडी सरकारच्या मदतीची करून दिली आठवण..

मागील काळात बोंड अळीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे मदत केली गेली, त्याप्रमाणे आमच्या शेतकऱ्यांना निकष बाजूला ठेवून विशेष आर्थिक मदत देण्याची गरज आहे. (Dhnanjay Munde)
Mla Dhnanjay Munde-Cm Eknath Shinde News
Mla Dhnanjay Munde-Cm Eknath Shinde NewsSarkarnama

बीड : काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त भागातील नागरीक व शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषापलिकडे जाऊन दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. (Beed) या निर्णयाचे काहीजणांनी स्वागत केले तर विरोधकांना ही मदत अजूनही तुटपुंजी वाटते.

माजीमंत्री धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांनी देखील शेतकऱ्यांवर ओढावलेले तिहेरी संकट पाहता सरकारने सगळे निकष बाजूला ठेवत विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी केली आहे. मंत्रीमंडळ बैठक झाल्यानंतर मुंडे यांनी ट्विट करत बीड जिल्हा आणि (Marathwada) मराठवाड्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती सांगितली.

मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला. असे असला तरी आमच्या बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात अनेक ठिकाणी सोयाबीनसह विविध पिकांचे गोगलगायीनी जे नुकसान केले, त्यास मदत मिळाली नाही. त्यांना विशेष आर्थिक मदत देण्यात यावी.

मागील काळात बोंड अळीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे मदत केली गेली, त्याप्रमाणे आमच्या शेतकऱ्यांना निकष बाजूला ठेवून विशेष आर्थिक मदत देण्याची गरज आहे.

Mla Dhnanjay Munde-Cm Eknath Shinde News
Aurangabad : जिल्ह्याला तीन कॅबिनेट मंत्री मिळाले ? आता पालकमंत्री कोण ?

वाया गेलेल्या तीन-चार पेरण्या, गोगलगायींचे नियंत्रण व संपत चाललेला हंगाम असे तिहेरी संकट आहे. त्यामुळे सरकारने जाहीर केलेली मदत ही पुरेशी नाही. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज देऊनच दिलासा मिळू शकतो, असेही मुंडे यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com