Osmanabad : गद्दारांनी पन्नास खोक्यांसाठी इमान विकले, निवडणुकीत धडा शिकवू..

मतदारांनी वर्गणी देऊन शिवसेनेच्या तिकिटावर निवडून दिले, त्यांनीच गद्दारी केली. (Yuvasena)
Yuvasena Leader Varun Sardesai News, Osmanabad
Yuvasena Leader Varun Sardesai News, OsmanabadSarkarnama

उमरगा : खोक्याच्या अमिषाशाला बळी पडून गद्दारी केलेल्या लोकप्रतिनिधींविषयी सामान्य नागरिक, जेष्ठ व निष्ठावंत शिवसैनिकांत प्रचंड राग आहे. (Osmanabad) निष्ठावंताच्या ताकदीसमोर शिवसेनेचे कुणीही वाकडे करू शकणार नाही. केवळ आमदार, खासदार गेले असले तरी सर्वसामान्य शिवसैनिक व नागरिकांची ताकद शिवसेनेसोबत आहे, हीच ताकद येणाऱ्या निवडणूकीत गद्दारांना चपराक लगावल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास (Yuvasena) युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केला.

उमरगा येथील आमदार व माजी खासदार यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीराम मंगल कार्यालयात शनिवारी युवासेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. (Varun Sardesai) सरदेसाई म्हणाले, ४० गद्दार आमदारांनी ५० खोक्यांसाठी इमान विकले, शिवसेनेशी व उध्दव ठाकरेंशी गद्दारी केली. येत्या निवडणुकीत निष्ठावंत शिवसैनिक व नागरिक त्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही.

सामान्य शिवसैनिकाला असामान्य करण्यासाठी मतदारांचा वाटा राहिला. मतदारांनी वर्गणी देऊन शिवसेनेच्या तिकिटावर निवडून दिले, त्यांनीच गद्दारी केली. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी हे संकट न समजता संधी समजुन शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी ताकद लावावी, असे आवाहन सरदेसाई यांनी केले.

Yuvasena Leader Varun Sardesai News, Osmanabad
शिक्षकांना बदनाम करून शाळा बंद करण्याचे कटकारस्थान, बंब हे त्याचे प्यादे ...

शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करून सर्वसामान्य माणसाला आमदार केले, त्यांनीच शिवसेना सोडली. सरणावर जाईपर्यंत गद्दार हा डाग पुसला जाणार नाही,अशी टीका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली.. युवा सेनेचे तालुकाप्रमुख चौधरी यांनी युवा सेनेच्या ताकदीने शिवसेनेला पुन्हा उभारी देण्याची ग्वाही दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in