उद्याचा महाराष्ट्र बंद शेतकऱ्यांच्या मदतीसाठी असता तर कौतुक केले असते ; भाजपचा टोला

(Shivsena Leader Chadrakant Khaire)मराठवाडा आणि राज्यातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे. त्याची पीकं, जमीनी, पशूधन, घरदार वाहून गेले. त्याला या संकटात मदतीचा हात देण्याची गरज आहे.
Mla Atul Save-Shivsena Leader Chandrakant Khaire
Mla Atul Save-Shivsena Leader Chandrakant KhaireSarkarnama

औरंगाबाद ः उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी जिल्ह्यात भाजपच्या मंत्र्याच्या मुलाने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या अंगावर जीप घालून त्यांना चिरडले. या संतपाजनक अमानवी घटनेच्या निषेधार्थ उद्या, (ता.११) रोजी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. आघाडीचे नेते या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन व्यापारी, नागरिकांना करत असतांनाच भाजपने मात्र यावर टीका केली आहे.

राज्यातील शेतकरी संकटात आहे, त्याचे पीक, शेती, घरदार, पशुधन सगळेच वाहून गेले. त्याला तातडीने मदत करण्याची गरज असतांना महाविकास आघाडीचे सरकार जी घटना आपल्या राज्यात घडलेली नाही त्याचे भांडवल केले जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचे लक्ष दुसरकीडे वळण्याचा केविलवाणा हा प्रयत्न असल्याचा आरोप भाजपचे आमदार अतुल सावे यांनी केला आहे. तर शेतकरी जगला तर व्यापारी, जनता जगेल असे सांगत या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.

लखीमपूर घटनेचे तीव्र पडसाद देशात आणि राज्यात उमटले आहे. उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष असल्याने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने देखील महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गाव, तालुका, जिल्हा पातळीवर हा बंद यशस्वी करा, एकूण एक दुकान, व्यवहार बंद ठेवून लखीमपुर घटनेचा निषेध करा, असे आवाहन सत्तेतील तीनही पक्षांना केले आहे.

त्यांनतर औरंगाबादेत या मुद्यावरून आता शिवसेना-भाजप आमने सामने आले आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मराठवाड्यातील व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. खैरे म्हणाले, लखीमपूर जिल्ह्यातील घटना संतापजनक आहे. अशावेळी आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. बंदचा व्यापारी, सर्वसामान्यांना त्रास होईल, पण शेतकरी जगला पाहिजे या भावनेतून तो आपण सहन करावा आणि बंद यशस्वी करावा.

शिवसेनेच्या या आवाहनावर भाजपने पलटवार करत आधी राज्यातील शेतकऱ्यांना वाचवा मग देशातील इतर भागातील प्रश्नावर बंद पुकारा, असा टोला लगावला आहे. भाजपचे आमदार अतुल सावे म्हणाले, लखीमपूर घटनेशी राज्याचा काही संबंध नाही. परंतु अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची गरज असतांना उत्तर प्रदेशातील त्या घटनेचे राजकीय भांडवल महाविकास आघाडी सरकारकडून केले जात आहे.

Mla Atul Save-Shivsena Leader Chandrakant Khaire
कर्तृत्वाने ठरले शिवाजीराव पंडित बीडच्या राजकारणातील `भीष्माचार्य`

आज मराठवाडा आणि राज्यातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे. त्याची पीकं, जमीनी, पशूधन, घरदार वाहून गेले आहे. त्याला या संकटात मदतीचा हात देण्याची गरज आहे. मात्र या महत्वाच्या प्रश्नावरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठीच राज्य सरकारकडून हा प्रकार केला जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर,त्यांना मदत मिळावी यासाठी, जर महाराष्ट्र बंद पुकारला असता तर आम्हाला त्याचे कौतुक वाटले असते, आम्ही देखील पाठिंबा दिला असता, असा चिमटा देखील सावे यांनी काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com