Imtiaz Jalil News : आंदोलनाला बदनाम करण्यासाठी कुणीतरी औरंगजेबाचे फोटो देवून तरुणांना घुसवले..

Chhatrapati Sambhajinagar : आम्ही हे आंदोलन शांतपणे आणि लोकशाली मार्गाने करत आहोत.
Imtiaz Jalil News, Chhatrapati Sambhajinagar
Imtiaz Jalil News, Chhatrapati Sambhajinagar Sarkarnama

Aimim : छत्रपती संभाजीनगर या नावाला विरोध दर्शवण्यासाठी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्या नेतृत्वाखाली नामांतरविरोधी कृती समितीने आजपासून साखळी उपोषण सुरू केले. दुपारी अचानक या आंदोलनात काही तरुणांनी औरंगजेबाचे फोटो झळकवत घोषणाबाजी केली. यामुळे एकच गोंधळ उडाला, नामांतराला विरोध समजू शकतो, पण औरंगजेबाचा फोटो कशासाठी? असा प्रस्न उपस्थितीत केला जातोय.

Imtiaz Jalil News, Chhatrapati Sambhajinagar
Chandrakant Khaire News : छत्रपती संभाजीनगर झाले, इम्तियाजजी आता राजकारण थांबवा..

यावर इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया देतांना आंदोलनाला बदनाम करण्यासाठी, गालबोट लावण्यासाठी कुणीतरी औरंगजेबाचे फोटो देवून या तरुणांना घुसवले असल्याची शक्यता व्यक्त केली. (Aimim) तसेच हा प्रकार घडताच आम्ही सदर तरुणांना आंदोलनस्थळावरून बाहेर हाकलले, असेही इम्तियाज यांनी स्पष्ट केले. (Marathwada) जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर आजपासून नामांतराच्या विरोधात साखळी उपोषण सुरु करण्यात आले.

यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील देखील उपस्थितीत होते. दरम्यान उपोषण सुरु झाल्यानंतर अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी आपला पाठिंबा दर्शवत आंदोलनस्थळी गर्दी केली. तरुण मोठ्या प्रमाणात औरंगाबादच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत होते. आंदोलन सुरळीत सुरु असतांना अचानक काही तरूण औरंगजेबाचे फोटो घेवून आंदोलनात आले. फोटो हातात घेवून उंचावत असतांना इतर तरुणांनी जिंदाबादच्या घोषणा द्यायला सुरूवात केली.

जल्लोष आणि गोंधळ सुरू असतांनाच आंदोलनाच्या आयोजकांनी या तरुणांना फोटोसह उपोषणास्थळातून बाहेर काढले. या प्रकाराबद्दल इम्तियाज जलील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करतांनाच कोणीतरी आंदोलन खराब करण्यासाठी काही लोकांना फोटो देऊन पाठवल्याचा आरोप देखील केला. पण आम्ही हे आंदोलन शांतपणे आणि लोकशाली मार्गाने करत आहोत. त्याला गालबोट लावण्याचा कुणी प्रयत्न केला तर तो खपवून घेतला जाणार नाही. त्यामुळे औरंगजेबाचा फोटो घेवून आलेल्या तरुणांना आम्ही तातडीने बाहेर काढले, असेही इम्तियाज जलील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com