देशमुखांना टक्कर देण्यासाठी कराड मैदानात; लातूरात दोन साखर कारखाने उभारणार

या प्रकल्‍पातून साखर आणि गूळ पावडर या दोन्‍हीचे ५० टक्‍के उत्‍पादन त्‍याचबरोबर सोयाबीनवर प्रक्रिया करणारा संलग्‍न प्रकल्‍प उभारण्याचा आपला प्रयत्न राहील. (Latur Bjp)
देशमुखांना टक्कर देण्यासाठी कराड मैदानात; लातूरात दोन साखर कारखाने उभारणार
Karad-Amit-Dhiraj DehsmukhSarkarama

लातूर : लातूर जिल्ह्यात साखर कारखानदारीत मोनोपोलीअसलेल्या देशमुख कुटुंबाला टक्कर देण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेशअप्पा कराड (Bjp) यांनी दंड थोपटले आहेत. ऊस उत्‍पादक शेतकरी आणि कार्यकर्त्‍यांच्‍या आग्रहाखातर त्‍यांची होणारी अडवणूक, पिळवणूक थांबविण्‍यासाठी लातूर (Latur) ग्रामीण विधानसभा कार्यक्षेत्रात लातूर आणि रेणापूर या दोन तालुक्यात प्रतिदिन दोन हजार टन ऊस गाळप क्षमतेचे दोन प्रकल्‍प लवकरच उभारणार असल्‍याची घोषणा कराड यांनी केली. (Marathwada)

जिल्ह्यातील राजकारण साखर कारखान्यांभोवती फिरते, यात देशमुख कुटुंब आघाडीवर आहे, सर्वाधिक साखर कारखाने हाती असल्यामुळे जिल्ह्याच्या राजकाणावर व सहाकर क्षेत्रावर गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांचा पगडा आहे. या वर्चस्वला धक्का देण्यासाठी कराड मैदानात उतरले आहेत. लातूर ग्रामीण विधानसभा कार्यक्षेत्रातील ऊस उत्‍पादक शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्‍यांची बैठक सोमवारी येथे झाली.

बैठकीत अनेक गावच्‍या ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांसह कार्यकर्त्‍यांनी उसाच्‍या संदर्भात निर्माण होत असलेल्‍या अडीअडचणी आणि व्‍यथा कराड यांच्यासमोर मांडल्या. शेतकऱ्यांच्‍या हितासाठी आपल्‍या हक्‍काचा प्रकल्‍प उभा करावा, अशी आग्रही मागणी केली. मांजरा परिवारातील सहकारी साखर कारखान्‍याचे शेतकरी, सभासद हे मालक असताना प्रस्‍थापितच मालक होऊन बसले आहेत. शेतकऱ्यांना न्‍याय देण्‍याची भूमिका घेण्‍याऐवजी अडवणूक केली जात असल्याचा आरोप देखील बैठकीत करण्यात आला.

अशा अडचणीत सापडलेल्या ऊस उत्‍पादकांना न्‍याय मिळावा, यासाठी आपणही साखर उद्योगात उतरले पाहिजे, अशी गळ कराड यांना घालण्यात आली. यावर विचार करून त्‍यातील बारकाव्‍याचा अभ्‍यास करून लातूर आणि रेणापूर या दोन तालुक्‍यात स्‍वतंत्रपणे प्रतिदिन दोन हजार टन उसाचे गाळप करणारा प्रकल्‍प उभा करणार, असे कराड यांनी जाहीर केले.

Karad-Amit-Dhiraj Dehsmukh
नितेश राणेंवर सरकारच्या दबावापोटी खोट्या केसेस, त्यांना जामीन नक्कीच मिळेल

या प्रकल्‍पातून साखर आणि गूळ पावडर या दोन्‍हीचे ५० टक्‍के उत्‍पादन त्‍याचबरोबर सोयाबीनवर प्रक्रिया करणारा संलग्‍न प्रकल्‍प उभारण्याचा आपला प्रयत्न राहील. यातून वीज निर्मिती, भविष्‍यात इथेनॉल निर्मिती करण्‍याचा मानस असल्‍याचेही कराड यांनी सांगितले. मांजरा परिवारातील साखर कारखान्‍यांनी शासनाच्‍या नियमानुसार एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांना भाव मिळावा यासाठी मांजराच्‍या गेट समोर आंदोलने केली.

मात्र, अद्यापही न्‍याय मिळालेला नाही. जोपर्यंत हक्‍काचा मोबदला मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. एफआरपीसाठी न्‍यायालयात गेलो तर गाळप परवाना रद्द होऊन कारखाने बंद होतील. म्‍हणून आज मी शांत आहे,असा इशाराही कराड यांनी बैठकीत दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.